शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे - मुरली मनोहर जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 04:22 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशातील सर्व धर्मांतील लोकांनी एकत्र यावे व राष्ट्रीय एकात्मता तसेच विविधतेचा नवा अध्याय सुरू करावा,

- सुरेश भुसारी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशातील सर्व धर्मांतील लोकांनी एकत्र यावे व राष्ट्रीय एकात्मता तसेच विविधतेचा नवा अध्याय सुरू करावा, अशी भावना ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. राम मंदिराच्या आंदोलनाचे डॉ. मुरली मनोहर जोशी नेते होते. ‘लोकमत’च्या मुलाखतीत ते म्हणाले, देशातील एका मोठ्या आंदोलनाची सांगता या निर्णयाने झाल्याचा आनंद आहे. हे आंदोलन भाजपचे नव्हते. भाजपची स्थापना होण्यापूर्वीपासून राम मंदिरासाठी आंदोलन सुरू होते.अनेकांचे या आंदोलनात योगदान होते. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे. या आंदोलनात भाजप सहभागी होता. परंतु आंदोलनाचे नेतृत्व धार्मिक संघटनांनी केले. या निकालाकडे हिंदू व मुस्लिमांचा प्रश्न म्हणून पाहू नये, असे आवाहन करून ते म्हणाले, श्रीराम हे केवळ हिंदूंचे नाहीत, साऱ्या जगामध्ये श्रीरामाची आराधना व प्रार्थना केली जाते. शीख, जैन, बौद्ध या धर्मांतही श्रीरामाला स्थान आहे. महाकवी इक्बालनेही श्रीरामाला इमाम-ए-हिंद मानले होते. त्यामुळे श्रीरामाला एका धर्मात बांधून ठेवणे योग्य नाही. न्यायालयाने मुस्लीम समाजाला ५ एकर जागा देण्यात यावी, असे म्हटले आहे. यावरही कुणी आक्षेप घेऊ नये. न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाने दिलेले पुरावेही मान्य केले आहेत. त्यामुळे कुणी यात संशय घेण्याचा काही प्रश्नच नाही. मंदिर बांधण्यासाठी जी काही व्यवस्था न्यायालयाने दिली आहे त्यानुसार बांधकाम सुरू व्हावे, असेही त्यांनी सांगितले. या निकालाबद्दल सुन्नी वक्फ बोर्डाने नाराजी व्यक्त केल्याचे सांगताच डॉ. जोशी म्हणाले, काही मतभेद राहू शकतात. सर्व निर्णय सर्वांना मान्य होतीलच, असे नाही. परंतु माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाने न्याय्य निकाल दिला आहे. सर्व बाजूंना न्यायालयाने लक्षात घेतले आहे.>याचे सारे श्रेय अडवाणी यांनासांप्रदायिक सौहार्द कायम ठेवून आम्हाला राम मंदिराकडून रामराज्याकडे जायला हवे. या आंदोलनात लाखो कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. आंदोलनाच्या नेतृत्वासाठी मी अशोक सिंघल व लालकृष्ण अडवाणी यांना श्रेय देतो. सिंघल हे विहिंपचे दीर्घकाळ राष्टÑीय अध्यक्ष होते व राममंदिर आंदोलनातील अग्रणींपैकी एक होते.- गोविंदाचार्य, संघाचे नेते

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर