up aligarh 5 year old child murderer accused police arrested after 22 years | धक्कादायक! ...अन् तब्बल 22 वर्षांनंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं; 'त्या' हत्येचं गूढ उकललं

धक्कादायक! ...अन् तब्बल 22 वर्षांनंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं; 'त्या' हत्येचं गूढ उकललं

अलीगड - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील मानपूर या गावात 22 वर्षांपूर्वी एका पाच वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. गळा दाबून मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलातील एका विहिरीत फेकून दिला होता. त्यानंतर आता 22 वर्षांनी हत्येचा तपास करण्यात यश आले आहे. 

पोलिसांनी पाच वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी त्याच्याच काही नातेवाईकांना अटक केली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून विहिरीत शोध घेतला असता मुलाच्या अस्थी सापडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण आणि हत्येनंतर गेली 22 वर्षे आरोपी आणि त्याचे कुटुंबीय वल्लभगड येथे राहत होते. कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क न ठेवल्यानं त्यांचा शोध लागू शकला नव्हता. पोलीस निरीक्षक आशीष कुमार सिंह यांनी 'वॉन्टेड' असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी खास मोहीम हाती घेतली.

पोलिसांनी दीपचंद्र, त्याचा मुलगा मलुआ उर्फ तेजवीर आणि त्याची पत्नी हरद्वारी देवी यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात 1998 साली सावत्र भाऊ रवी कुमारचा 5 वर्षीय मुलगा अशोकचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडली त्या दिवशीच हे तिघे बेपत्ता होते. स्थानिक पोलिसांनी शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. 'वॉन्टेड' गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी 20 दिवस मोहीम राबवली. त्यानंतर या तिघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संपत्तीच्या वादातून 5 वर्षांच्या अशोकचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध

बापरे! देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, 'या' राज्यांना केलं अलर्ट

CoronaVirus News : खरंच की काय? लॉकडाऊनमध्ये वाया गेलेली वाईन वाचवणार आता लोकांचा जीव; पण कसा...

CoronaVirus News : कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; तब्बल 261 जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! ...म्हणून सिंगापूरमध्ये शेफ असलेल्या तरुणाला चाराव्या लागताहेत बकऱ्या

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: up aligarh 5 year old child murderer accused police arrested after 22 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.