शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

कृष्णभक्तीत लीन झाला जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनीचा मालक, केला हिंदू धर्माचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 3:42 PM

दशवतारांमधील पूर्णावतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भक्त केवळ भारतातच नाही तर साता समुद्रापारही आहेत.

ठळक मुद्देजगप्रसिद्ध अमेरिकन कारनिर्माता कंपनीचे मालक अल्फ्रेड फोर्ड यांनाही कृष्णभक्तीची ओढ लागली आहेकृष्णभक्तीच्या ओढीने त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला असून, अम्बरिश दास हे नाव धारण केले आहेकृष्णभक्तीमुळे आपल्या जीवनाला पूर्णत्व आल्याचे दास सांगतात

कोलकाता - आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन. दशवतारांमधील पूर्णावतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भक्त केवळ भारतातच नाही तर साता समुद्रापारही आहेत. दरम्यान, जगप्रसिद्ध अमेरिकन कारनिर्माता कंपनीचे मालक अल्फ्रेड फोर्ड यांनाही कृष्णभक्तीची ओढ लागली आहे. याच कृष्णभक्तीच्या ओढीने त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला असून, अम्बरिश दास हे नाव धारण केले आहे. कृष्णभक्तीमुळे आपल्या जीवनाला पूर्णत्व आल्याचे दास यांनी सांगितले.अम्बरिश दास (अल्फ्रेड फोर्ड) हे सध्या बंगालमधील नादिया जिल्ह्यातील मायापूर येथे ११३ मीटर उंच अशा भव्य श्रीकृष्ण मंदिराची निर्मिती करत आहेत. निर्माणाधीन असलेल्या या मंदिराचे नामकरण श्री मायापूर चंद्रोदय असे करण्यात आलेले आहे. या मंदिराचा एक लाख चौरस फूट आकाराचा भाग तयार झाला आहे. तर उर्वरित मंदिर २०२२ पर्यंत आकार घेण्याची शक्यता आहे.आपल्या कृष्णभक्तीबाबत अम्बरिश दास (अल्फ्रेड फोर्ड) सांगतात की, कृष्णभक्तीने मला पूर्णत्व दिले आहे. जन्म घेतल्यापासून मी भौतिक सुख-संपत्ती आणि मोहमायेत गुंतलो होते. माझ्याकडे सर्वकाही होते. मात्र माझ्या आत काहीतरी अपूर्णत्व आहे, असे मला वारंवार वाटे. माझ्यातील या अपूर्णत्वाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. यादरम्यान मी गुरू महाराज श्रील प्रभुपाद यांना भेटलो. त्यानंतर मी श्रीकृष्णाच्या माध्यमातून माझ्यातील अपूर्णत्वाचा शोध घेतला. हे मंदिर माझ्या गुरूंचे स्वप्न आहे. त्यामुळे ते स्वप्न पूर्ण करून त्यांच्या चरणी अर्पण करणे हे आता माझ्यासमोरील उद्दीष्ट आहे.आपण अशा जगात राहतो जिथे प्रत्येकजण महत्त्वाकांक्षी आहे. इथे ईर्षा आहे. संघर्ष आहे. आपल्याकडे जे काही नाही ते मिळवण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे इथे नेहमीच स्पर्धा सुरू असते. मात्र कुणीही येथून जाताना काहीही घेऊन जात नाही. त्यामुळेच मी आणि माझी पत्नी या अध्यात्मिक जगामध्ये मोहमायेपासून दूर जाऊन खूप समाधानी आहोत. येथील प्रसन्नता स्थायी स्वरूपाची आहे.अल्फेड फोर्ड हे जगविख्यात कार निर्माता कंपनी फोर्ड मोर्टर्सचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे नातू आहेत. आता संपूर्ण जगात ते अम्बरीश दास या नावाने आणि कृष्णभक्तीसाठी प्रसिद्ध झाले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात ते अमेरिकेतून पश्चिम बंगालमधील मायापूर येथे होणाऱ्या गौर पौर्णिमेसाठी सहपरिवार येतात. येथील चैतन्य महाप्रभूंच्या जन्मस्थळावर त्यांनी तब्बल ८०० कोटी रुपये खर्चून त्यांनी भव्य कृष्ण मंदिर उभे केले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीHinduismहिंदुइझमFordफोर्डIndiaभारतAdhyatmikआध्यात्मिक