शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 11:09 PM

यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांचे पथकही, ज्या शाळांना इमेल आला त्या शाळांमध्ये पोहोचले. मात्र, तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यानंतर दिल्ली सरकारने शाळांसाठी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

दिल्ली एनसीआरमधील जवळपास 100 शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी आज (बुधवार) एका इमेलच्या माध्यमाने मिळाली. यानंतर अनेक शाळांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या धमकीनंतर, अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांचे पथकही, ज्या शाळांना इमेल आला त्या शाळांमध्ये पोहोचले. मात्र, तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यानंतर दिल्ली सरकारने शाळांसाठी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

दिल्ली सरकारची अ‍ॅडव्हायजरी... -- शाळा व्यवस्थापन/व्यवस्थापक/सरकारी शाळांचे मुख्य अधिकारी यांनी ईमेल आयडी आणि मेसेज शाळा सुरू होण्यापूर्वी, शाळा सुरू असताना आणि नंतरही अवश्य चेक करावा.- कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा साहित्य दिसल्यास तत्काळ संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी आणि दिल्ली पोलिसांना माहिती द्यावी.- विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत, शाळा व्यवस्थापनाने कुटुंबातील सदस्य आणि संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांशी त्वरित संपर्क साधावा.

दिल्ली पोलिसांना मिळाले 143 कॉल -दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी शाळांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीशी संबंधित 143 कॉल आले होते. मात्र, गाझियाबाद आणि नोएडातील शाळांना मिळालेल्या धमकीशी संबंधित किती कॉल पोलिसांना मिळाले, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना मिळताच  सर्व शाळांमध्ये श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक पाठवून तपासणी करण्यात आली. तेथे कसल्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये.

गुन्हेगारांना सोडणार नाही - यासंदर्भात बोलताना, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना म्हटले, शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळताच पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले होते. मी जनतेला विश्वास देतो की, दिल्ली पोलीस पूर्णपणे तयार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमचा प्रयत्न असेल. गुन्हेगारांना सोडणार नाही.

टॅग्स :SchoolशाळाBombsस्फोटकेPoliceपोलिसdelhiदिल्ली