अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला अपघात, 44 जखमी

By Admin | Updated: December 28, 2016 11:19 IST2016-12-28T07:03:13+5:302016-12-28T11:19:25+5:30

कानपूरमधील रुरा स्टेशनजवळ एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले आहेत. अपघातामुळे कानपूर मार्गाच्या रल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Ajmer - Sealdah Express collision, 44 injured | अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला अपघात, 44 जखमी

अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला अपघात, 44 जखमी

ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 28 - कानपूरमधील रुरा स्टेशनजवळ एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले आहेत. अपघातामुळे कानपूर मार्गाच्या रल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातामध्ये 44 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली होती, मात्र कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. जखमींमध्ये ट्रेनच्या गार्डचाही समावेश आहे. 
 
अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसला हा अपघात झाला आहे. अजमेर - सियालदाह एक्स्प्रेसचे (12988) 14 डबे पहाटे साडे पाचच्या सुमारास रुळावरुन घसरले आहेत अशी माहिती रेल्वे अधिका-याने दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच कानपूर रेल्वे विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. या अपघातामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 
 
दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे. तसंच अपघातास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असंही सांगितलं आहे.
 
तसंच रेल्वेने हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत -
 
गेल्याच महिन्यात कानपूरमध्येच रेल्वे अपघात झाला होता ज्यामध्ये 140 जणांनी आपला जीव गमावला होता. इंदूरवरुन पाटणाला जाणा-या इंदूर इंटरसिटी गाडीचे 14 डब्बे रुळावरुन घसरले होते. 
 
 

Web Title: Ajmer - Sealdah Express collision, 44 injured