शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 23:01 IST

Air India Plane Crash in Kerla, Latest News : कोझिकोडेतील करीपूर विमानतळावर भीषण अपघात

तिरुअनंतपूरमः केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून १२३ जण जखमी झाले आहेत. तर १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. मलप्पुरमच्या एसपींनी याबद्दलची माहिती दिली. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नागरी उड्डाण संचलनालयानं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Air India Express Accident)दुबई-कोझिकोड बोईंग ७३७ या विमानात १९१ प्रवासी होते आणि ते संध्याकाळी ७ वाजून ४१ वाजता विमानतळावर दाखल झालं. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरलं. हे विमान दुबईहून प्रवासी घेऊन जात होतं. या विमानात १९१ जण असल्याचं सांगण्यात येत आहे. वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचं IX-१३४४ विमान प्रवासी घेऊन येत होतं. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना करीपूर विमानतळावर सायंकाळी पावणे आठ वाजता घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, दोन वैमानिकांसह सहा क्रू मेंबर्स विमानात होते. विमान अपघातग्रस्त झालं, तेव्हा त्यात १९१ प्रवासी होते. विमान अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघातानंतर विमानाच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. डीजीसीएने घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया