शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एअरफोर्स वन भारताकडे रवाना

By admin | Updated: January 25, 2015 02:04 IST

तीन दिवसीय भारत दौऱ्याकरिता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वॉशिंग्टन येथून शनिवारी रवाना झाले.

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : तीन दिवसीय भारत दौऱ्याकरिता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वॉशिंग्टन येथून शनिवारी रवाना झाले. नियोजित आग्रा दौरा रद्द करून ते थेट नवी दिल्लीहून सौदी अरेबियाला राजे अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान, जगप्रसिद्ध ताजमहल पाहण्यापासून आपण मुकणार असल्याबद्दल ओबामा यांनी खंत व्यक्त केली आहे.नव्या कार्यक्रमानुसार, राष्ट्राध्यक्ष ओबामा व फर्स्ट लेडी मिशेल राजे अब्दुल्ला यांच्याप्रति शोकभावना व्यक्त करण्यासाठी गुरुवारी रियाधला जाऊन राजघराण्याची भेट घेणार आहेत. भारत सरकारशी समन्वय साधून राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याची नव्याने आखणी करण्यात आल्याचे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले. अमेरिकी नागरिकांकडून राजे अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी रियाधला जाण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ओबामांना नियोजित आग्रा भेट रद्द करावी लागली आहे. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. दौऱ्यादरम्यान उप राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे वॉशिंग्टनमध्ये राहणार असल्याचेही व्हाइट हाउसच्या निवेदनात म्हटले आहे. नवी दिल्लीतील अमेरिकी वकिलातीने हे निवेदन जारी केले आहे. तत्पूर्वी अमेरिकी उप राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ ओबामांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी सौदीला जाणार होते. राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष दोन्हींपैकी एक नेता देशात राहावा या उद्देशाने ओबामांच्या दौऱ्यात फेरबदल करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.गुरुवारी राजधानी दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरिअममधील एका भाषणानंतर बराक ओबामा हे पत्नी मिशेल यांच्यासोबत थेट रियाधला रवाना होतील.