शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लॅटरल एंट्री आणि क्रिमी लेयरप्रमाणे वक्फ विधेयक मागे घ्यावे लागेल; ओवैसींचा भाजपवर घणाघात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 14:30 IST

AIMIM on Waqf Board : 'वक्फ मालमत्ता ही सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्ता नसून खाजगी मालमत्ता आहे.'

AIMIM on Waqf Board : गेल्या काही दिवसांपासून देशात वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाची (Waqf Board) चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने हे विधेयक सध्या संसदीय समितीकडे (JPC) पाठवले असून, पुढच्या अधिवेशनात संसदेत सादर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या विधेयकावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) सातत्याने टीका करत आहेत. अशातच आता ओवेसींनी याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

असदुद्दीन ओवेसी सातत्याने या विधेयकाला संविधानविरोधी आणि मुस्लीमविरोधी म्हणत आहेत. दरम्यान, आता या विधेयकाविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी ओवेसींनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, 'आम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली आहे. वक्फ विधेयकासंबंधीची दुरुस्ती संविधानाच्या विरोधात आहे. मोदी सरकारचा वक्फ बोर्ड संपवण्याचा डाव आहे.' 

'भाजप खोटा प्रचार करत आहे...''वक्फ मालमत्ता ही सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्ता नसून खाजगी मालमत्ता आहे. तुम्ही सार्वजनिक मालमत्ता का मानता? तुम्ही काय वक्फ बोर्डाला अनुदान देत आहात का? देशातील कोणते राज्य सरकार वक्फ बोर्डाला अनुदान देते? वक्फ दुरुस्तीमुळे घटनेच्या कलम 15 आणि 25 चे उल्लंघन होत आहे. ही दुरुस्ती वक्फ मालमत्ता नष्ट करण्यासाठी आहे, त्यांचे संरक्षण करण्यासाठी नाही. लॅटरल एंट्री आणि दलित क्रिमी लेयरप्रमाणेच सरकारला हे वक्फ दुरुस्ती विधेयकही मागे घ्यावे लागेल. वक्फ न्यायाधिकरणाच्या विरोधात कोणीही जाऊ शकत नाही, असा खोटा प्रचार भाजप करत आहे, हे चुकीचे आहे, त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते,' असेही ओवेसी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा