शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादचे कॉल सेंटर बंद!

By admin | Updated: October 10, 2016 05:32 IST

ठाणे जिल्हयातील मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून ७० जणांना अटक केल्याचे वृत्त देशभर पसरताच अहमदाबाद येथील प्रल्हादनगरमधील पिनॅकल बिझनेस

ठाणे : ठाणे जिल्हयातील मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून ७० जणांना अटक केल्याचे वृत्त देशभर पसरताच अहमदाबाद येथील प्रल्हादनगरमधील पिनॅकल बिझनेस सेंटर हे कॉल सेंटरही तडकाफडकी बंद करण्यात आले आहे. हे कॉल सेंटर बंद झाल्यामुळे येथील ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याद्वारे कोणाला फसविले, याचाही तपास आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी गुजरात पोलिसांच्या मदतीने करीत आहेत.अहमदाबाद शहरातील प्रल्हादनगरमधील या पिनॅकल बिझनेस सेंटरमध्ये चार कॉल सेंटर अशाच प्रकारे सुरू होती. तिथूनही अमेरिकेत धमक्या देणारे, फसवणुकीचे तसेच खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू होते. याबाबतची खातरजमा झाल्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी पोलीस उपायुक्त पराग मणेरे, युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक एन. टी. कदम, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे निरीक्षक रवींद्र दौंडकर, उपनिरीक्षक विजय उपाळे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी शनिवारी धाडसत्र राबविले. मात्र, चार पैकी एकाही कॉल सेंटरवर कर्मचारी सोडा कोणतीही साधनसामुग्री उपलब्ध पोलिसांना मिळाली नाही. ५ आॅक्टोबरला ठाण्यात धाड टाकल्याचे समजल्यानंतर ६ आॅक्टोबरला एकाच दिवसात कॉल सेंटर रिक्त करण्यात आले. त्याचदिवशी कॉल सेंटरच्या भाड्यापोटीची रक्कमही संबंधितांना अदा करण्यात आली. अहमदाबाद पाठोपाठ दिल्ली, चंदीगड, कलकत्ता येथील कॉल सेंटर बंद झाली. देशभरात कोणत्याही ठिकाणी त्याबाबतची माहिती मिळाल्यास तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)