शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 09:01 IST

Donald Trump's India Visit : ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये; घरं रिकामी करण्यासाठी ७ दिवसांची मुदत

ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.मोटेरा स्टेडियम परिसरातल्या ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसारहिवाशांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींचा आणि ट्रम्प यांच्या दौऱ्यांचा संबंध नाही; पालिकेचा दावा

अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधल्या झोपड्यांसमोर भिंत उभारल्याची घटना ताजी असताना आता अशाच प्रकारचं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. नव्या मोटेरा स्टेडियमच्या परिसरात राहणाऱ्या ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याची नोटीस अहमदाबाद महानगरपालिकेनं पाठवली आहे. यासाठी संबंधितांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये येत आहेत. मोटेरा स्टेडियमजवळ असलेल्या ४५ झोपड्यांमध्ये जवळपास २०० जण वास्तव्यास आहेत. हे सर्व जण नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला घरं रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला. गेल्या २० वर्षांपासून आपण याच भागात राहत असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. अहमदाबाद महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी मात्र रहिवाशांचा हा दावा फेटाळून लावला. रहिवाशांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींचा ट्रम्प यांच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं.रहिवाशींनी घरं उभारलेली जमीन महापालिकेच्या मालकीची असल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. 'तुम्ही ज्या भागावर अतिक्रमण केलं आहे, ती जमीन महापालिकेची असून शहर रचना योजनेच्या अंतर्गत येते,' असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे. रहिवाशांना घरं रिकामी करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मुदत २४ फेब्रुवारीला संपते. याच दिवशी ट्रम्प अहमदाबादमध्ये येणार आहेत. झोपडपट्टीवासीयांना नोटिशीविरोधात अपील करायचं असल्यास त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोटेरा स्टेडियममधल्या कार्यक्रमाचा आणि झोपडपट्टीवासीयांना बजावण्यात आलेल्या नोटिशींचा कोणताही संबंध नसल्याचा दावा पालिकेच्या मोटेरा वॉर्डचे सहाय्यक शहर विकास अधिकारी किशोर वर्मा यांनी केला. रहिवाशांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींवर वर्मा यांचीच स्वाक्षरी आहे. काही जण ट्रम्प यांच्या कार्यक्रमाचा फायदा घेऊ पाहत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पGujaratगुजरातahmedabadअहमदाबाद