मुलीची छेड काढल्यावरुन तरुणाला चोपले

By Admin | Updated: August 2, 2016 23:18 IST2016-08-02T23:18:46+5:302016-08-02T23:18:46+5:30

जळगाव: मुलीची छेड काढणार्‍या एका तरुणाला मुलीच्या वडिलांनी तसेच भावाने भररस्त्यावर चोपल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी पुतळा परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ घडली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. एका पोलीस कर्मचार्‍याने तेथे धाव घेऊन छेड काढणार्‍या तरुणाला पोलीस स्टेशनला नेण्याचे सांगितले, परंतु दोन जणांनी त्या तरुणाला दुचाकीवर बसवून नेले, मात्र त्याला पोलीस स्टेशनला न नेता दुसर्‍याच ठिकाणी घेऊन गेले. या मारहाणीचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर फिरला. दोन दिवसापूर्वीही याच परिसरात महाविद्यालयाच्या शेजारी मुलीसोबत गप्पा मारणार्‍या तरुणाला तिच्या वडिलांनी चोपल्याची घटना घडली होती.

After the girl's torture, the girl was stabbed | मुलीची छेड काढल्यावरुन तरुणाला चोपले

मुलीची छेड काढल्यावरुन तरुणाला चोपले

गाव: मुलीची छेड काढणार्‍या एका तरुणाला मुलीच्या वडिलांनी तसेच भावाने भररस्त्यावर चोपल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी पुतळा परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ घडली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. एका पोलीस कर्मचार्‍याने तेथे धाव घेऊन छेड काढणार्‍या तरुणाला पोलीस स्टेशनला नेण्याचे सांगितले, परंतु दोन जणांनी त्या तरुणाला दुचाकीवर बसवून नेले, मात्र त्याला पोलीस स्टेशनला न नेता दुसर्‍याच ठिकाणी घेऊन गेले. या मारहाणीचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर फिरला. दोन दिवसापूर्वीही याच परिसरात महाविद्यालयाच्या शेजारी मुलीसोबत गप्पा मारणार्‍या तरुणाला तिच्या वडिलांनी चोपल्याची घटना घडली होती.

Web Title: After the girl's torture, the girl was stabbed