शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:18 IST

SIR Process Begins In West Bengal: बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याची घोषणा केली होती. मात्र मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष आमने-सामने आले होते. तरीही निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचं काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण केलं आहे. दरम्यान, बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आधीच बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावरून वाद निर्माण झाला असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. यासंदर्भातील एसआयआर प्रक्रियेंतर्गत राज्यामध्ये १ ऑगस्ट रोजी सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणामधून सुमारे  ६५ लाख अपात्र मतदारांची नावं मतदार यादीमधून हटणार आहेत. यामधील बहुतांश मतदार हे अपात्र ठरले आहेत. यापैकी बहुतांश मतदार हे मृत आहेत. तर काही जणांनी दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झालेले आहेत. तर काही मतदारांचं एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये नाव आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगwest bengalपश्चिम बंगालVotingमतदान