शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 05:21 IST

तामिळनाडू सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपच्या विक्रीवर १ ऑक्टोबरपासून बंदी घातली असून बाजारातील साठा परत मागवला आहे. 

चेन्नई  : मध्य प्रदेश व राजस्थानातील मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा संशय असलेल्या तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या (कफ सिरप) नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आली आहे.

तामिळनाडूच्या अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की,  कंपनीच्या औषधाच्या नमुन्यांची अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असून एका कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली आहे. या कंपनीला कफ सिरपचे उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून स्पष्टीकरण मागवले आहे. 

‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदीतामिळनाडू सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपच्या विक्रीवर १ ऑक्टोबरपासून बंदी घातली असून बाजारातील साठा परत मागवला आहे. 

मध्य प्रदेशातही ‘कोल्ड्रिफ’वर बंदीभोपाळ : छिंदवाडा जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून ९ मुलांचे संशयितरीत्या मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या विक्रीवर राज्यभर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कंपनीच्या इतर उत्पादनांवरही कारवाई होणार असल्याचे सांगितले. चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सांगितले की, छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे ७ सप्टेंबरपासून मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या कफ सिरपमध्ये ‘ब्रेक ऑइल सॉल्व्हेंट’ मिसळल्याचा संशय आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Adulteration Found in Cough Syrup; Production, Sales Halted

Web Summary : Tamil Nadu company's cough syrup, suspected in child deaths, found adulterated. Production halted, explanation sought. 'Coldrif' syrup banned in Tamil Nadu and Madhya Pradesh following kidney failure deaths. Investigations are ongoing.
टॅग्स :Healthआरोग्य