शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जल्लिकट्टूचं उद्घाटन करण्यास आलेल्या पनीरसेल्वमना आंदोलकांनी हुसकावलं

By admin | Updated: January 22, 2017 13:48 IST

जल्लिकट्टूवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपात उठवल्यानंतरही तामिळी जनतेचा असंतोष शांत होण्याची काही चिन्हे नाहीत.

ऑनलाइन लोकमततामिळनाडू, दि. 22 - जल्लिकट्टूवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपात उठवल्यानंतरही तामिळी जनतेचा असंतोष शांत होण्याची काही चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री पनीरसेल्वम अलनगनल्लुर गावात जल्लिकट्टूचं उद्घाटन करण्यास आले असता त्यांना तामिळी जनतेनं हुसकावून लावलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी मदुराईमध्ये जल्लिकट्टूला पाठिंबा दर्शवण्यासंदर्भातील कार्यक्रम रद्द केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चेन्नईमधल्या मरिना बीचवर जल्लिकट्टूच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात जनता उतरली होती. जल्लिकट्टूला समर्थन देण्यासाठी तामिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केव्हिट दाखल केलं आहे. त्या केव्हिटमध्ये सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकारचं मत विचारत घेतल्याशिवाय कोणताही निर्णय न देण्याची विनंती केली आहे. आंदोलकांनी मदुराईमधल्या महामार्गावर रास्ता रोको करून तो बंद केला आहे. (जलिकट्टू अध्यादेशाला कायदे मंत्रालयाची मंजुरी)

(जलिकट्टूसाठी एकवटलं तामिळनाडू, रेलरोको, शाळाही बंद)

प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू अ‍ॅनिमल अ‍ॅक्ट 1960 अंतर्गत जल्लिकट्टूला मान्यता देण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही सहमती दर्शवली आहे. जल्लिकट्टूला परवानगी देणारं विधेयक सोमवारी तामिळनाडूच्या विधानसभेत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर जल्लिकट्टूला तात्पुरत्या स्वरुपात परवानगी मिळणार आहे. मात्र आंदोलकांना जल्लिकट्टूवर तात्पुरत्या स्वरूप नव्हे तर कायमस्वरुपी तोडगा पाहिजे आहे.