प्रवाशांचे साहित्य पळविणारी टोळी सक्रिय

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:30+5:302014-12-28T23:40:30+5:30

प्रवाशांचे साहित्य पळविणारी टोळी सक्रिय

Activating the gang fleeing passengers | प्रवाशांचे साहित्य पळविणारी टोळी सक्रिय

प्रवाशांचे साहित्य पळविणारी टोळी सक्रिय

रवाशांचे साहित्य पळविणारी टोळी सक्रिय
रेल्वे प्रवासी असुरक्षित : झोपेतील प्रवाशांचा घेतात गैरफायदा
नागपूर : प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे महागडे साहित्य पळविणारी टोळी रेल्वेगाड्यात सक्रिय झाली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेगाड्यात असुरक्षित वाटत आहे. अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत असून रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
सबाउद्दीन अहमद रफिउल्ला अन्सारी (२५) रा. अलाहाबाद हे रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ पटणा-सिकंदराबाद एक्स्प्रेसने (कोच एस-१०, बर्थ २९, ३२) आपल्या कुटुंबीयांसोबत प्रवास करीत होते. दरम्यान इटारसी रेल्वेस्थानक येण्यापूर्वी ते गाढ झोपेत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांची ट्रॉलीबॅग पळविली. ट्रॉलीबॅगमध्ये सोन्याच्या ३ अंगठ्या किंमत ३० हजार रुपये, नवीन कपडे किंमत ८ हजार रुपये, मेकअपचे साहित्य किंमत २ हजार रुपये असा एकूण ४० हजाराचा मुद्देमाल होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेगाड्यात प्रवाशांचे साहित्य लंपास करणारी टोळी सक्रिय झाली असून या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (प्रतिनिधी)
..............

Web Title: Activating the gang fleeing passengers