शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बचत गट चालविणार्‍या संस्था अधीक्षिकेचे अपहरण? पाच जणांनी अपहरण केल्याचा आरोप : तीन दिवसानंतर आढळल्या जखमी अवस्थेत

By admin | Updated: March 4, 2016 22:37 IST

जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खुद्द भालेराव यांनीच हा प्रकार पत्रकार व पोलिसांना सांगितला.

जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खुद्द भालेराव यांनीच हा प्रकार पत्रकार व पोलिसांना सांगितला.
भालेराव यांच्या म्हणण्यानुसार त्या मंगळवारी दुपारी त्यांच्या नाटेकर नावाच्या महिला सहकार्‍यांना घेऊन कारने काव्यरत्नावली चौकातील एका बॅँकेत संस्थेचे पैसे भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी हे पाच तरुण आपला पाठलाग करीत असल्याचा संशय त्यांना आला. बॅँकेत गेल्यानंतर कारमध्ये शिक्का विसरल्याने त्यांनी नाटेकर यांना तो शिक्का घेण्यासाठी पाठविले. त्या येण्याच्या आत भालेराव तोंडाला स्कार्फ बांधून बॅँकेतून बाहेर पडल्या. एका रिक्षाला हात दिला. तेव्हा त्याच रिक्षातून आलेल्या तरुणांनी ओढून तोंडाला प˜ी बांधली. नंतर बेशुध्द केले. शुध्दीवर आल्या तेव्हा त्या पारोळ्याच्या जंगलात होत्या.दोन दिवस तेथे त्यांनी बेदम मारहाण केली. गुरुवारी पहाटे कारमधून मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना खाली शुध्द आली. तेथे आरडाओरड केली असता त्यांनी डोक्यात रॉड टाकून चालत्या कारमधून फेकून दिले व तेथून पळ काढला.
पारोळ्यात घेतली मदत
पहाटे पाच वाजेच्या दरम्यान पारोळ्यातील लक्ष्मणदादा कॉलनीत भेटलेले कल्पना खैरनार व राहुल खैरनार यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सरला पाटील यांच्यावर आरोप
रामेश्वर कॉलनीतील सरला मनोज पाटील व संस्था अध्यक्ष सलीम पिंजारी, सविता भालेराव यांच्यात बचत गटाच्या महिलांकडून घेण्यात आलेल्या पैशांच्याबाबतीत वाद आहेत. जिल्हा पेठ व शहर पोलीस स्टेशनला तक्रारीही झाल्या होत्या. यातून भालेराव यांना संस्थेच्या कार्यालयात एकदा मारहाणही झाली होती. अपहरणकर्त्या तरुणांना आपण सरला पाटील यांच्यासोबत बर्‍याच वेळा पाहिले आहे,त्यामुळे त्यांनीच हा कट रचला आहे, असा आरोप सविता भालेराव यांनी केला. रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, गुन्हे शोध पथकाचे प्रदीप चौधरी व शरद पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भालेराव यांचा जबाब नोंदविला आहे.