पंतप्रधान मोदींचा नारा बदलला; 'मैं देश नहीं बिकने दूंगा' नव्हे, 'मैं देश नहीं बचने दूंगा', खासदाराची कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 11:14 AM2021-02-02T11:14:57+5:302021-02-02T11:15:21+5:30

एक 'सपूत' असतो, जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढतो, तर एक 'कपूत' असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो. (Mai desh nahi bachane dunga.)

AAP leader sanjay singh raised questions on Budget 2021 and targets pm narendra modi | पंतप्रधान मोदींचा नारा बदलला; 'मैं देश नहीं बिकने दूंगा' नव्हे, 'मैं देश नहीं बचने दूंगा', खासदाराची कविता

पंतप्रधान मोदींचा नारा बदलला; 'मैं देश नहीं बिकने दूंगा' नव्हे, 'मैं देश नहीं बचने दूंगा', खासदाराची कविता

googlenewsNext

नवी दिल्ली- केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर, आम आदमी पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा होती, की "देश नहीं बिकने दूंगा." मात्र, आता उद्योग पतींच्या प्रेमाखात त्यांनी आपली घोषणा बदलली आहे. आता पंतप्रधान मोदींची घोषणा "मैं देश नहीं बचने दूंगा," अशी झाली असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे. याच बरोबर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये संजय सिंह यांनी म्हटले आहे, पीएम मोदी एकदा म्हणाले होते की, 'ये देश नहीं बिकने दूंगा. मैं देश नहीं मिटने दूंगा, मात्र, अर्थसंकल्प पाहिल्यानंतर चार ओळी सुचतात. पंतप्रधानांची घोषणा बदली आहे. ‘ये देश नहीं बचने दूंगा…ये खेत-खलिहान नहीं बचने दूंगा, किसान नहीं बचने दूंगा…नौजवान नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा… ये देश नहीं बचने दूंगा, व्यापार नहीं बचने दूंगा… कर्मचारी नहीं बचने दूंगा, बैंक नहीं बचने दूंगा…LIC नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा… ये देश नहीं बचने दूंगा, ये सेल नहीं बचने दूंगा… ये रेल नहीं बचने दूंगा, BPCL नहीं बचने दूंगा… एयरपोर्ट नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा…ये देश नहीं बचने दूंगा.’

पतंजली पाच लाख तरुणांना देणार रोजगार; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची मोठी घोषणा

आप खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत सवाल केला आहे, की त्यांच्या सरकारने अर्थसंकल्प नेमका कुणासाठी तयार केला? चार भांडवलदारांसाठी तयार केला. त्यांना फायदा करून देण्यासाठी आणि संपूर्ण देश त्यांनाच विकण्यासाठी तयार केलाय. देशाच्या जनतेला समजले आहे, की मोदी देशाचे नाही तर केवळ चार भांडवलदार मित्रांचेच पंतप्रधान आहेत. त्यांच्याच हातात देशाची संपत्ती गहाण ठेऊन सर्व काही विकण्याचा विचार आहे. एक 'सपूत' असतो, जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढतो, तर एक 'कपूत' असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो.

पेट्रोलच्या किंमतीवरून 'राम-रावण'!; 'या' ज्येष्ठ खासदाराकडून मोदींना घरचा आहेर!

आप शिवाय इतर राजकीय पक्षांनीही मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. तर, दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे काही राज्यांमधील निवडणुकांसाठी तयार केलेला मार्ग आहे. गरिबांच्या हातात रोख मिळेल, अशा काही तरतुदी यात करण्यात येतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, खासगीकरण आणि निर्गुंतवणूक करत देश विक्रीसाठी ठेवला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला. 

Web Title: AAP leader sanjay singh raised questions on Budget 2021 and targets pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.