आमिर खान याला थप्पड मारणाऱ्यास १ लाख रुपये

By Admin | Updated: November 27, 2015 09:56 IST2015-11-27T00:28:33+5:302015-11-27T09:56:46+5:30

अभिनेता आमिर खान याच्या असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्यावरून उठलेल्या वादादरम्यान शिवसेनेच्या एका नेत्याने आमिरला थप्पड मारणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

Aamir Khan slapped a million rupees | आमिर खान याला थप्पड मारणाऱ्यास १ लाख रुपये

आमिर खान याला थप्पड मारणाऱ्यास १ लाख रुपये

लुधियाना : अभिनेता आमिर खान याच्या असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्यावरून उठलेल्या वादादरम्यान शिवसेनेच्या एका नेत्याने आमिरला थप्पड मारणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
आमिरला थप्पड मारणाऱ्यास प्रत्येक थप्पडमागे एक लाख रुपये बक्षीस दिले जाईल, असे शिवसेनेच्या पंजाब शाखेचे अध्यक्ष राजीव टंडन यांनी जाहीर केले आहे. अर्थात शिवसेनेने यापासून स्वत:ला नामनिराळा करत हे पक्षाचे अधिकृत वक्तव्य नसल्याचे स्पष्ट केले.
एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. आमिर सध्या पंजाबच्या लुधियाना येथे ‘दंगल’ चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहे. बुधवारी काही निदर्शकांनी तो थांबला असलेल्या हॉटेलबाहेर जोरदार नारेबाजी केली. याचदरम्यान राजीव टंडन यांनी आमिरला थप्पड मारणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Aamir Khan slapped a million rupees