शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पार्टीचे 'स्टिंग'

By admin | Updated: September 9, 2014 03:59 IST

राजधानी दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पार्टी (भाजपा) आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप)केला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच भारतीय जनता पार्टी (भाजपा) आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप)केला आहे. या आरोपाच्या पुराव्यादाखल आपने एक स्टिंग ऑपरेशन केले आहे. दिल्लीचे भाजपा उपाध्यक्ष शेरसिंह डागर हे आप आमदाराला पक्ष सोडण्यासाठी चार कोटी रुपयांचा प्रस्ताव देत असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसत आहे. तथापि डागर यांनी हा आरोप धुडकावून लावला असून आपल्या चुकीच्या पद्धतीने गोवण्यात येत असल्याचा प्रतिआरोप केला आहे.आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी येथील पत्रपरिषदेत, हे स्टिंग ऑपरेशन उघड केले. संगम विहारचे आपचे आमदार दिनेश मोहनिया यांना डागर पक्ष सोडण्यासाठी चार कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. केजरीवाल या स्टिंग ऑपरेशनचे रॉ फुटेज उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयास सोपवणार असून निवडणूक आयोगाकडेही जाणार आहे. भाजपाकडे दिल्लीत सरकार बनविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी सरकार बनवावे पण आम्ही अनैतिक मार्गाने त्यांना सरकार स्थापन करू देणार नाही, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. भाजपाने आमच्या आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांना अनेक आमिषे दिली जात आहेत, असेही ते म्हणाले.दिल्लीच्या सत्तेसाठी भाजपा आतूर!दिल्लीचे तख्त बळकावण्यासाठी भाजपा सज्ज झाली असून आता केवळ भाजपाला नायब राज्यपालांच्या सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाची प्रतीक्षा आहे. आम्ही दिल्लीत सरकार स्थापन करू नायब राज्यपालांच्या निमंत्रणाची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे वरिष्ठ सरकारी सूत्रांनी आज सोमवारी सांगितले.नायब राज्यपालांचे निमंत्रण मिळताच भाजपा नेतृत्व एक बैठक बोलवून या बैठकीत दिल्लीत सत्ता स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल, असे स्पष्ट संकेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना आज याबाबत विचारले असता, तूर्तास याबाबत माझ्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. सध्या हा मुद्दा राष्ट्रपती आणि नायब राज्यपाल यांच्यात आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपाकडे तूर्तास २९ आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना आणखी पाच आमदारांचा पाठिंबा हवा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपमधून बडतर्फ करण्यात आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी आणि अन्य एक अपक्ष आमदार भाजपाला पाठिंबा देण्यास तयार आहे. पण याउपरही भाजपाला आणखी तीन आमदारांचा पाठिंबा हवा आहे. (प्रतिनिधी)