शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवरही चालू शकतो लैंगिक अत्याचार खटला- दिल्ली उच्च न्यायालय; खंडपीठ काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 07:20 IST

"पुरुष आणि महिला दोघेही लैंगिक छळ करू शकतात"

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पोक्सो कायद्यांतर्गत महिलांविरूद्ध लैंगिक अत्याचार आणि गंभीर लैंगिक अत्याचाराची प्रकरणेदेखील चालविली जाऊ शकतात. अशा प्रकरणांमध्ये महिला ओरोपी असणे, ही ढाल ठरू शकत नाही. पुरुष आणि महिला दोघेही लैंगिक छळ करू शकतात, असे निरीक्षण दिल्लीउच्च न्यायालयाने शनिवारी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान नोंदवले.

एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जयराम भंभानी यांची टिप्पणी आली. याचिकेत युक्तिवाद केला होता की, पोक्सो कायद्याच्या कलम ३ अंतर्गत  लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणि कलम ५ अंतर्गत गंभीर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा एखाद्या महिलेवर नोंदविला जाऊ शकत नाही. कारण त्याच्या व्याख्येत फक्त ‘तो’ हे सर्वनाम वापरले गेले आहे, जे स्त्रीचे नव्हे तर पुरुषाचे प्रतिनिधित्व करते.

काय म्हटले खंडपीठाने?

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला. बालकाविरूद्ध गुन्हा एखादा पुरुष किंवा स्त्रीही करू शकते, असे न्यायमूर्तींनी आपल्या १५ पानी आदेशात म्हटले आहे. खंडपीठाने म्हटले की, ‘कलम ३ (अ), ३ (ब), ३ (क) आणि (ड) मध्ये वापरण्यात आलेल्या ‘तो’ या सर्वनामाचा अशा प्रकारे अर्थ लावला जाऊ नये की, त्या कलमांमध्ये समाविष्ट केलेले गुन्हे केवळ पुरुषापर्यंत मर्यादित आहेत. 

त्याच्या व्याप्तीमध्ये लिंगाचा भेद न करता कोणत्याही गुन्हेगाराचा (स्त्री आणि पुरुष दोन्ही) समावेश आहे. या तरतुदींमध्ये लैंगिक अत्याचाराच्या कक्षेत कोणतीही वस्तू किंवा शरीराच्या भागाचा प्रवेश किंवा पेनेट्रेशनसाठी मुलाच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे किंवा तोंडाचा वापर करणेदेखील समाविष्ट आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळhusband and wifeपती- जोडीदारdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय