शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

'दोन वर्षापूर्वीच पुलाबाबत सरकारला पत्र दिले होते'; गुजरात पूल अपघातावर जिल्हा पंचायत सदस्याचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:50 IST

गुजरातमधील आणंद येथे आज सकाळी गंभीरा पूल कोसळल्याने वडोदरा आणि आणंदमधील संपर्क तुटला. या अपघातात ९ जणांना आपला जीव गमवावा लागला.

गुजरातमध्ये सकाळी ८ वाजता आणंद आणि वडोदराला जोडणारा नदीवरील पूल कोसळला. या घटनेत चारपेक्षा जास्त वाहने नदीत कोसळले. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेबाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हा पंचायत सदस्य हर्षद सिंह परमार यांनी या पुलाबद्दल सरकारला केलेला लेखी अर्ज चर्चेत आहे. या अर्जात पुलाच्या जीर्ण अवस्थेबद्दल माहिती देण्यात आली होती. जर या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर अनेकांचे जीव वाचू शकले असते.

दरम्यान, हर्षद सिंह परमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, सरकार जाणूनबुजून लोकांचे जीव घेते. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी आहे.

आकाशात मोठा स्फोट झाला आणि..., राजस्थानमध्ये मोठा विमान अपघात, चुरू येथे विमान कोसळले

हर्षद सिंह परमार म्हणाले की, ज्या ठिकाणी हा पूल तुटला आहे ते माझे गाव आहे. माझे घर या पुलापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. मी येथील जिल्हा पंचायतीचा सदस्य आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये आम्ही या पुलाच्या जीर्ण अवस्थेबाबत सरकारला एक लेखी निवेदन दिले होते. यामध्ये आम्ही म्हटले होते की,  आम्ही विनंती केली होती की जर या पुलाचे ब्लॉक इतके हलत असतील की काहीतरी अनुचित घडू शकते. म्हणून, हा पूल बंद करून नवीन पूल बांधावा, अशी मागणी आम्ही केली होती. 

सिंह म्हणाले, "आमच्या अर्जानंतर गांधीनगर येथील आर अँड बी विभागाचे अधिकारी येथे आले. त्यांनी त्या जागेची पाहणी केली आणि सांगितले की कंपन सामान्यपेक्षा थोडे जास्त आहे. यावेळी आम्ही सांगितले की पुलाची दुरुस्ती करा किंवा जनहितार्थ चाचणी अहवाल प्रकाशित करा. जर असा दोष असेल तर तुम्ही पूल कसा चालवू शकता? पण या लोकांनी पूल सुरूच ठेवला.

"मी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे. सरकारच्या गंभीर दुर्लक्षामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशाप्रकारे सरकार जाणूनबुजून लोकांचे प्राण घेते".

हर्षद सिंह परमार, जिल्हा पंचायत सदस्य

टॅग्स :Gujaratगुजरात