पदवीधरांची फौज, पण नोकरी मिळेना! ४०% तरुण बेरोजगार; अझीम प्रेमजी विद्यापीठाचा धक्कादायक अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:59 IST2026-03-18T06:58:26+5:302026-03-18T06:59:34+5:30

२००४-०५ पासूनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५० लाख पदवीधरांची भर पडते. त्यापैकी केवळ २८ लाख पदवीधरांनाच नोकरी मिळविण्यात यश येते. 

A bunch of graduates, but no jobs 40 percent of youth unemployed; Shocking report by Azim Premji University | पदवीधरांची फौज, पण नोकरी मिळेना! ४०% तरुण बेरोजगार; अझीम प्रेमजी विद्यापीठाचा धक्कादायक अहवाल 

पदवीधरांची फौज, पण नोकरी मिळेना! ४०% तरुण बेरोजगार; अझीम प्रेमजी विद्यापीठाचा धक्कादायक अहवाल 


नवी दिल्ली : भारतातील उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी, पदवीधरांच्या हाताला काम मिळण्याचे प्रमाण मात्र चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या 'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया' अहवालानुसार, देशातील २० ते २९ वयोगटातील ६.३ कोटी पदवीधरांपैकी तब्बल १.१ कोटी पदवीधर बेरोजगार आहेत. 

वयोगट बेरोजगारी प्रमाण (%)
२० ते २५  -    ४०%
२५ ते २९     -        २०%

तरुणांमधील बेरोजगारीचा विळखा -
२००४-०५ पासूनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५० लाख पदवीधरांची भर पडते. त्यापैकी केवळ २८ लाख पदवीधरांनाच नोकरी मिळविण्यात यश येते. 

नोकरी मिळवण्यात अनंत अडचणी -
स्वतःला बेरोजगार म्हणून नोंदवणाऱ्या पदवीधरांपैकी केवळ ७ टक्के तरुणांनाच पदवी मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत कायमस्वरूपी पगाराची नोकरी मिळवण्यात यश येते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कामाच्या ठिकाणी होणारे हे स्थित्यंतर आव्हानात्मक असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

वेतनश्रेणीतील स्त्री-पुरुष -
पदवीधर नसलेल्या उमेदवारांपेक्षा पदवीधरांचे सुरुवातीचे वेतन दुप्पट असते. मात्र, गेल्या काही वर्षांत पदवीधर पुरुषांच्या सुरुवातीच्या पगारवाढीचा वेग मंदावला आहे.
चांगली बाब म्हणजे, वेतन श्रेणीतील स्त्री-पुरुष भेदभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, जे तरुण महिलांसाठी श्रम बाजारातील सुधारलेले निकाल दर्शवते.

Web Title : डिग्रीधारकों के लिए नौकरी का संकट: 40% युवा बेरोजगार, रिपोर्ट।

Web Summary : शिक्षा बढ़ने के बावजूद, भारत में 40% स्नातक (20-25 आयु वर्ग) बेरोजगार हैं। स्नातक होने के एक साल के भीतर कुछ ही लोगों को स्थिर नौकरी मिलती है। लिंगों के बीच वेतन अंतर कम हो रहा है।

Web Title : Graduates struggle for jobs: 40% youth unemployed, says report.

Web Summary : Despite rising education, 40% of graduates (20-25 age) are unemployed in India. Only few secure stable jobs within a year of graduating. Wage gap between genders is decreasing.