प्रेयसीला पळवून नेताना प्रियकराचा जागीच मृत्यू; जखमी तरूणीने सांगितला घटनेचा थरार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 05:38 PM2023-03-28T17:38:47+5:302023-03-28T17:39:23+5:30

छत्तीसगडमधील कोंडागाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

   A boyfriend who was taking his girlfriend died in a road accident at Kondagaon in Chhattisgarh   | प्रेयसीला पळवून नेताना प्रियकराचा जागीच मृत्यू; जखमी तरूणीने सांगितला घटनेचा थरार!

प्रेयसीला पळवून नेताना प्रियकराचा जागीच मृत्यू; जखमी तरूणीने सांगितला घटनेचा थरार!

googlenewsNext

Boyfriend running away with girlfriend । कोंडागाव : छत्तीसगडमधील कोंडागाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कोंडागाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बाईकने  धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली तरूणी गंभीर जखमी झाली आहे. संबंधित तरूणीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. खरं तर मृत तरूण आणि दुखापतग्रस्त तरूणी हे प्रेमी युगुल असल्याचे सांगितले जात आहे.

प्रियकराचा जागीच मृत्यू 
माहितीनुसार, कोंडागाव येथील बनियागाव येथील नीलम पोयाम (24) ही तरूणी गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी कोंडागाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे उपचारादरम्यान नीलम पोयाम हिने पलारी गावातील राजकुमार यादव (21) या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. काल रात्री राजकुमार यादव हा पलारी गावातून नीलम पोयाम हिला घेण्यासाठी दुचाकीवरून बनियागाव येथे आला होता. तेथून दोघेही दुचाकीने पलारी गावाकडे निघाले असता राष्ट्रीय महामार्ग 30 वर उभ्या असलेल्या ट्रकची आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेत 21 वर्षीय राजकुमार यादव हा जागीच ठार झाला.  

जखमी तरूणी नीलम पोयाल हिने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार तिला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी आला होता. तसेच घरातील सदस्यांच्या नकळत ती त्याच्यासोबत घरातून पळून जात असता हा अपघात झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title:    A boyfriend who was taking his girlfriend died in a road accident at Kondagaon in Chhattisgarh  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.