शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत ४९ वर्षांच्या ‘द्रविड’ सत्तेला विजयची टक्कर, सत्तेसाठी अण्णाद्रमुक की द्रमुक कोण देणार साथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:16 IST

सत्ताविरोधी लाटेचा टीव्हीकेला मोठा फायदा

चेन्नई : मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांनाही चकीत करणारी लाट तामिळनाडूच्या राजकारणात दशकांनंतर उसळताना दिसत आहे, चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारपासून प्रत्यक्ष राजकारणात उतरलेले थलापती विजय यांनी राज्यातील जनतेसमोर एक नवा आणि सक्षम पर्याय उभा केला आहे. राज्यातील गेल्या पाच दशकांपासून मजबूत असलेला द्रमुक - अण्णाद्रमुक राजकारणाचा गड, अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने हादरवून सोडला आहे. आतापर्यंत सत्तेची सूत्रे केवळ या दोन द्रविड पक्षांमध्येच फिरत होती. मात्र, यावेळी टीव्हीकेच्या उदयाने हा एकाधिकार पूर्णपणे खंडित केला आहे.

तामिळनाडूच्या राजकारणावर मागील ४९ वर्षांपासून फक्त द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोनच द्रविड पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. सत्तेची अदलाबदल याच दोन गटांमध्ये होत आली आहे. मात्र आता अभिनेता ते राजकारणी झालेल्या विजय यांच्या टीव्हीकेने दशकांपासून चालत आलेल्या एकाधिकारशाहीला थेट आव्हान दिले आहे. विजय यांच्या सभांमध्ये दिसणारी प्रचंड गर्दी आता मतांमध्येही परिवर्तित झाली आहे.

विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. सध्या विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०७ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे समर्थन घेतील, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

प्रत्येक प्रचारसभेत विजय यांनी सत्ताधारी द्रमुक आणि केंद्रातील भाजपवर जोरदार टीका केली. या दोन्ही पक्षांना त्यांनी आपले प्रमुख राजकीय आणि वैचारिक प्रतिस्पर्धी म्हणून स्पष्टपणे मांडले. मात्र, या आक्रमक भूमिकेतही एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली. विजय यांनी अण्णाद्रमुकबाबत  कायमच सौम्य भूमिका घेतली. त्यांनी अण्णाद्रमुकवर तीव्र किंवा कडवा हल्ला केला नाही. याचा राजकीय फायदा आता विजय यांना होऊ शकतो.

स्टॅलिनविरोधातील लाटेचा लाभ

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या विरोधातील सत्ताविरोधी लाटेचा सर्वाधिक आणि थेट फायदा टीव्हीकेला झाला. अण्णाद्रमुक व भाजप जनतेचा पूर्ण विश्वास संपादन करण्यात मागे पडताना दिसत आहेत. या निवडणुकीत घराणेशाही आणि नेत्यांच्या अहंकाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे.

तामिळनाडूच्या राजकारणाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिथे चित्रपटसृष्टीतील ‘सुपरस्टार’च राजकारणाचे ‘नायक’ ठरतात. एम. जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी आणि जे. जयललिता ही नावे याच परंपरेची साक्ष देतात. जयललिता  आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर तमिळ राजकारणात निर्माण झालेली ‘सुपरहिरो’ची पोकळी अभिनेता थलापती विजय यांनी भरून काढत एक नवा चेहरा दिला आहे.

थलापती विजय यांनी युवकांना आणि महिलांना एका स्वच्छ, प्रामाणिक पर्यायाचे स्वप्न दाखवले आहे. या नायकाने आता राजकारणाच्या खऱ्या मैदानातही आपली जादू चालवली असून, तामिळनाडूच्या राजकीय पटलावर ते एक नवा इतिहास घडविण्यास सज्ज झाले आहेत.

सिनेमा ते सत्ता : ‘थलापती’चा उदय

एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांचे चित्रपटसृष्टीशी नाते असले तरी, विजय यांची ‘स्टारडम’ची उंची अतुलनीय आहे. तमिळ चित्रपटसृष्टीत पूर्णपणे ‘मास अपील’ असलेला सुपरस्टार म्हणून विजय यांनी आपली ओळख निर्माण केली. चाहत्यांनी त्यांना दिलेली ‘थलापती’ (सेनापती/नेता) ही पदवी आज त्यांच्या राजकीय नेतृत्वाची ओळख बनली आहे.

अण्णाद्रमुक देणार साथ?

अण्णाद्रमुक आणि टीव्हीके यांची युती हा सर्वांत स्वाभाविक पर्याय ठरू शकतो. द्रमुकला सत्तेबाहेर करण्यासाठी हीच सर्वोत्तम संधी असल्याची जाणीव अण्णाद्रमुकलाही आहे. त्यामुळे, परिस्थिती तशी निर्माण झाल्यास अण्णाद्रमुक आपला सहयोगी भाजपचा पाठिंबा सोडून थेट विजय यांना साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘बूथ लेव्हल’पर्यंत फळी

विजयने पक्षाची स्थापना केल्यापासून शांतपणे तळागाळात काम केले. त्याने थेट जनतेत जाऊन संवाद साधण्याऐवजी, प्रत्येक मतदारसंघात ‘बूथ लेव्हल’पर्यंत आपली फळी तयार केली.

निवडणुकीच्या रिंगणात त्याने स्वच्छ प्रतिमेचे तरुण चेहरे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना संधी दिली. मोठ्या सभेपेक्षा छोट्या कोपरा सभांवर दिलेला भर आणि शिट्टी या चिन्हाचा केलेला प्रचार यामुळे ग्रामीण भागात त्याची पकड घट्ट झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay challenges Dravidian dominance in Tamil Nadu, alliance prospects rise.

Web Summary : Actor Vijay's party, TVK, has shaken Tamil Nadu's Dravidian political stronghold. With significant wins, TVK could potentially align with AIADMK to challenge DMK's power amid anti-incumbency sentiment. Vijay's focus on youth and clean politics resonates.
टॅग्स :Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६