शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:19 IST

एक लहान मुलगा त्याच्या आजारी आईसाठी रक्ताची बॉटल हातात धरून असल्याचं दिसत आहे, तर वडील आईला एक्स-रे विभागात नेण्यासाठी स्ट्रेचर ओढत आहेत.

सरकारी रुग्णालयातील धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगा त्याच्या आजारी आईसाठी रक्ताची बॉटल हातात धरून असल्याचं दिसत आहे, तर वडील आईला एक्स-रे विभागात नेण्यासाठी स्ट्रेचर ओढत आहेत. वेदनादायक गोष्ट म्हणजे उपचारातील या निष्काळजीपणाची किंमत महिलेला जीवावर बेतली आहे. सीएमएस डॉ. सचिन माहूर यांनी प्राथमिक चौकशीनंतर पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

३ मे २०२५ रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय शकुंतला नायक यांना गंभीर अवस्थेत झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलं. पोटात संसर्ग झाल्यानंतर, स्थानिक डॉक्टरांनी त्यांना झाशी येथे रेफर केलं, जिथे त्यांना वॉर्ड क्रमांक दोनमध्ये दाखल करण्यात आलं. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, शकुंतलाची प्रकृती गंभीर झाल्यावर डॉक्टरांनी रक्त चढवण्याचा सल्ला दिला. 

८ मे रोजी रक्त देण्यास सुरुवात झाली, परंतु त्याच वेळी महिलेला एक्स-रेसाठी रेडिओलॉजी विभागात पाठवण्यात आलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे रुग्णालयातील कोणताही कर्मचारी किंवा वॉर्ड बॉय महिलेला तपासणीसाठी घेऊन गेला नाही. असहाय्य पतीने स्वतः स्ट्रेचर ओढलं आणि ९ वर्षांचा मुलगा सौरभ त्याच्या आईसोबत हातात रक्ताची बॉटल घेऊन चालत राहिला. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा फोटो काढला आणि तो फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यानंतर मेडिकल कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली.

मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयंक सिंह यांनी सीएमएस डॉ. सचिन माहूर यांना तात्काळ चौकशी करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर, सीएमएसने संबंधित वॉर्डला भेट दिली, सर्व कागदपत्र पाहिली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासणीत असं दिसून आले की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेमुळे एका महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर