शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

कोरोना कोणासाठी ठरतोय जीवघेणा?; आरोग्य मंत्रालयानं सांगितला 'धोक्या'चा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 6:49 PM

88 percent corona deaths in people above age 45 says central health secretary: ४५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका; सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या १० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्राचे ९ जिल्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा वेगानं वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक भागांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच केंद्रीय आरोग्य यंत्रणेचीदेखील चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेत देशातल्या कोरोना प्रादुर्भावाची माहिती दिली. यावेळी त्यांनी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशातल्या पहिल्या १० जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली. यामधील ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. पुणे (४३,५९० रुग्ण), नागपूर (३३,१६० रुग्ण), मुंबई (२६,५९९ रुग्ण), ठाणे (२२,५१३ रुग्ण), नाशिक (१५,७१० रुग्ण), औरंगाबाद (१५,३८०), नांदेड (१०,१०६), जळगाव (६,०८७) आणि अकोला (५,७०४) जिल्ह्यांचा समावेश आहे.कोरोनाचा कहर! देशातील टॉप १० मध्ये ९ शहरं महाराष्ट्रातील, केंद्र सरकार चिंतेत; निर्बंध कठोर होणार?देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशातल्या पहिल्या १० जिल्ह्यांचा विचार केल्यास यातले पहिले ६ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. यानंतर सातव्या स्थानी बंगळुरू शहरचा (१०,७६६ रुग्ण) क्रमांक लागतो. यानंतर पुन्हा आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर महाराष्ट्रातले जिल्हे आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं आकडेवारीवरूनदेखील स्पष्ट झालं आहे.भय इथले संपत नाही! ब्राझीलमधील मृतांचे आकडे हादरवणारे; 24 तासांत 3251 कोरोनाबळी कोरोना कोणासाठी ठरतोय जीवघेणा?कोरोनातून बऱ्या होणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. कोरोना लसीकरणाचा वेगदेखील वाढवला जात आहे. मात्र ४५ हून अधिक वय असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा एकूम आकडा लक्षात घेतल्यास यातल्या ८८ टक्के व्यक्ती पंचेचाळीशी ओलांडलेल्या आहेत, असं आरोग्य सचिवांनी सांगितलं. हा धोका लक्षात घेऊनच ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.गुजरात, मध्य प्रदेशातही परिस्थिती गंभीरगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थितीनं चिंता वाढवल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे २५ हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर पंजाबमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. या २ राज्यांसोबतच गुजरात, मध्य प्रदेशमधील स्थितीदेखील चिंताजनक आहे. गुजरातमध्ये दिवसाला जवळपास १७०० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर मध्य प्रदेशात दिवसाकाठी १५०० कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या