शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

85 वर्षांच्या आजींची इच्छा, संपूर्ण जमीन करायचीय पंतप्रधान मोदींच्या नावावर; भावूक करणारं आहे कारण

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 3, 2020 16:07 IST

या 85 वर्षीय आजींचे नाव बिट्टन देवी असून त्या पूरन लाल यांच्या पत्नी आहेत. त्या विकास खंड किशनीतील गाव चितायन येथे राहतात. त्या बुधवारी दुपारी वकील कृष्णप्रताप सिंह यांच्या कडे गेल्या होत्या.

लखनौ -उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात बुधवारी एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. येथे एक आजी आपली संपूर्ण जमीन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्यासाठी थेट तहसील कार्यालयात पोहचल्या. या आजींना आपली संपूर्ण जमीन पंतप्रधान मोदींच्या नावावर करण्याची इच्छा असल्याचे ऐकल्यानंतर वकीलही हैराण झाले. आपली सर्व शेती पंतप्रधान मोदींच्या नावावर करण्यासाठी या आजी आडून बसल्या आहेत. मात्र, यामागचे कारण अत्यंत भावूक करणारे आहे. 

या 85 वर्षीय आजींचे नाव बिट्टन देवी असून त्या पूरन लाल यांच्या पत्नी आहेत. त्या विकास खंड किशनीतील गाव चितायन येथे राहतात. त्या बुधवारी दुपारी वकील कृष्णप्रताप सिंह यांच्या कडे गेल्या होत्या. त्यांनी वकिलाला सांगितले, की आपली साडे 12 बीघे जमीन आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करायची इच्छा आहे. बिट्टन देवी यांनी असे म्हणताच वकील हैराण झाले. यानंतर वकील कृष्णप्रताप सिंह यांनी बिट्टन देवी यांना बराच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

यानंतर वकिलांनी त्यांच्यासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर बिट्टन देवी म्हणाल्या, त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यांची दोन मुले आणि सुना त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. सरकारकडून मिळत असलेल्या वृद्धावस्था पेन्शनने त्यांचा उदरनिर्वाह होत आहे. यामुळे आपल्या नावावर असलेली शेती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्याची त्यांची इच्छा आहे.

यानंतर, वकील कृष्णप्रताप सिंह यांनी आपण उप जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात बोलू, असे सांगून घरी पाठवले आहे. यानंतर, आपण दोन दिवसांनी पुन्हा येऊ असे सांगून आजी परत गेल्या आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशprime ministerपंतप्रधान