शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : जिल्‘ात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्‘ात पेरण्यांनाही वेग आला आहे. ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के क्षेत्र खरिपाच्या पेरणीखाली आले आहे.

जळगाव : जिल्‘ात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्‘ात पेरण्यांनाही वेग आला आहे. ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के क्षेत्र खरिपाच्या पेरणीखाली आले आहे.
रविवार सकाळ पासूनच जिल्‘ात पावसाला सुरुवात झाली. जिल्‘ात बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्‘ात एकूण सरासरी ५८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जून आणि जुलै महिन्यात एकूण सरासरी १०७ मि. मी. पाऊस झाला आहे.

७२ टक्के पेरण्या...
समाधानकारक पावसामुळे पेरण्यांनाही वेग आला असून ११ जुलै अखेर ७२.७२ टक्के पेरण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्‘ात एकूण खरिपाच्या पेरणीचे क्षेत्र ८ हजार ३३२.१६ हेक्टर असून त्यापैकी ६१२१.५३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे. सर्वाधिक क्षेत्र कपाशी खाली असून ५३१३.९९ हेक्टर अनुमानित क्षेत्रापैकी ३६४०.२८ हेक्टर क्षेत्रावर (६८.५० टक्के) क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. तेलबियाखालील क्षेत्र २९९.५७ हेक्टर असून त्यापैकी २८६.६९ हेक्टर क्षेत्रावर (९५.७० टक्के) पेरण्या आटोपल्या आहेत. तेलबियांमध्येही सोयाबीन खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीनखाली १६८.६७ हेक्टर क्षेत्र असण्याचे अनुमान होते मात्र प्रत्यक्षात २४६.७८ हेक्टर क्षेत्रावर (१४६.३१ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्य पिकांमध्ये ज्वारीचे क्षेत्र ८०३.२० हेक्टर असून ४२८.२ हेक्टर (५३.२९ टक्के) क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. बाजरीचे लागवड क्षेत्र २१६.८१ हेक्टर असून ११८.६ हेक्टर क्षेत्रावर (५४.४५ टक्के), पोरणी मक्या खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मक्याचे अनुमानित क्षेत्र ७५१.९५ हेक्टर असून प्रत्यक्षात ८१५.५२ हेक्टर क्षेत्रावर(१०८.४५ टक्के) मक्याची पेरणी झाली आहे. कडधान्य पिकात तुरी खालचे क्षेत्र वाढले आहे. १७०.४७ हेक्टर अनुमानित क्षेत्रापैकी प्रत्यक्षात १८६.९३ (१०९.६६ टक्के) हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड झाली आहे. तर मुगाचे क्षेत्र ३६२.१० हेक्टर असून ३२९.२७ हेक्टर (९०.९३ टक्के) क्षेत्रावर मुगाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. उडीद पिकाखाली ४११.६१ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३१०.२९ हेक्टर (७५.३७ टक्के) क्षेत्रावर उडीद लागवड झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यावर आणखी पेरण्यांना आणि आंतर मशागतीच्या कामांना वेग येईल, त्यामुळे येत्या आठवडाभरात पेरणी क्षेत्रात वाढ झालेली असेल, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.