शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

माहुरकुड्याची ७० वर्षीय केशरबाई निराश होऊन परतली

By admin | Updated: September 6, 2014 02:03 IST

अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाला आलेल्या माहुरकुडा येथील ७० वर्षीय केशरबाई जैराम कोडापे ...

काम संथगतीने : उपमहापौरांच्या घोषणेला उलटला महिना
वडाळागाव : येथील महारुद्र हनुमान मंदिराच्या मागील बाजूस बांधण्यात आलेल्या वीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात परंतु संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अद्याप जलकुंभावरून होणार्‍या पाणीपुरवठ्याला मुहूर्त मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वडाळागावाचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत व्हावा, यासाठी नवीन जलकुंभ महापालिका प्रशासनाने बांधला असून, या जलकुंभाचे काही तांत्रिक काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे सदर जलकुंभ ठेकेदाराकडून हस्तांतरीतदेखील करण्यात आला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. जलकुंभाचे काम कासवगतीने सुरू असून, दुसरीकडे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर वडाळा जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी घोषणा केली होती; मात्र कुलकर्णी यांचा सदर मुहूर्त टळला असून, त्यांची घोषणा हवेत विरली आहे. जलकुंभाची रंगरंगोटी झाली असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात बहुतांश काम अपूर्ण असून त्यामुळे विलंब होत असल्याची माहिती उपअभियंता अनिल नरसिंगे यांनी दिली आहे. जलकुंभाचे कोणते काम अपूर्ण आहे असे त्यांना विचारले असता नरसिंगे यांनी सांगण्यास स्पष्ट नकार दिला. एकूणच जलकुंभाच्या कामाची अधिकार्‍यांकडून उपमहापौरांना सविस्तर माहिती दिली गेली नसल्यामुळे कदाचित उपमहापौरांनी जलकुं भावरून पाणीपुरवठा लवकरच सुरू केला जाईल, हे जाहीर करण्याची घाई केली असावी. महापालिकेचे अधिकारी-लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे नागरिकांची अपेक्षा भंग होते. याचा प्रत्यय वडाळागावाचा जलकुंभ सुरू करण्याबाबत आला असून, अधिकारी म्हणतात जलकुंभाचे काम अपूर्ण व उपमहापौर म्हणतात जलकुंभाचे काम पूर्ण यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकूणच या नवीन जलकुंभावरून वडाळावासीयांच्या नळांना कधी पाणीपुरवठा होईल? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
कोट....
वडाळा जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, केवळ जलकुंभाच्या आतील बाजूचे रंग हवामानामुळे वाळत नसल्याने जलकुं भ सुरू करण्यास विलंब होत आहे. जलकुंभाच्या नवीन जलवाहिन्यांच्या जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे व बांधकामदेखील पूर्णत्वास आले आहे. याबाबत माझा पाठपुरावा सुरू असून, लवकरच वडाळा जलकुंभ सुरू होईल, याची खात्री नागरिकांनी बाळगावी.
- सतीश कुलकर्णी, उपमहापौर

फोटो क्रमांक- ०२पीएचएसपी १४५- वडाळागावातील जलकुंभ सुरू करण्याला अद्याप मुहूर्त लागत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.