शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अधिका-यांना सेक्सचे आमीष दाखवल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास

By admin | Updated: February 17, 2015 11:36 IST

सरकारी अधिका-यांना कोणत्याही कामाच्या बदलात लैंगिक सुखाचे आमीष दाखवल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १७ - सरकारी अधिका-यांना कोणत्याही कामाच्या बदलात लैंगिक सुखाचे आमीष दाखवल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने लाचखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये या नवीन नियमाचा समावेश केला जाणार आहे. 
गेल्या आठवड्यात कायदा समितीने केंद्र सरकारला प्रिव्हेंशन ऑफ करप्शन (सुधारित) या विधेयकावर त्यांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये समितीने काही शिफारसी करण्यात आल्या असून हे विधेयक संसदेच्या पुढील सत्रात सादर केले जाण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत सरकारी कर्मचा-यांनी लाच स्वीकारणे याचाच कायद्यात समावेश होता. यामध्ये कंपनीचा समावेश नव्हता. पण कायदा समितीच्या शिफारसीमध्ये आता खासगी व्यावसायिक कंपनीलाही कायद्याच्या कचाट्यात आणले जाणार आहे. यापुढे खासगी कंपनीत काम करणा-या कर्मचा-याने सरकारी अधिका-याला लाच देण्याचा प्रयत्न केला तर त्या कंपनीला जबाबदार धरले जाणार आहे.   
विद्यमान विधेयकात लाचेच्या व्याख्येत 'आर्थिक व अन्य लाभ' याचा उल्लेख केला गेला आहे. यामध्ये कायदा समितीने सुधारणा करण्यास सांगितले असून याऐवजी आता अनुचित लाभ या शब्दाचा वापर करावा असे समितीने म्हटले आहे. अनुचित लाभ या शब्दाची व्याख्या सांगताना समिती म्हणते, सरकारी अधिका-यांना कोणत्याही स्वरुपात 'खूश' करणे. यामध्ये लैंगिक सुखाचे आमीष याचाही समावेश करावा. 
भ्रष्टाचाराच्या संपवण्याचे आश्वासन देत सत्तेवर विराजमान झालेल्या मोदी सरकारने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे बदल या विधेयकात केले होते.  यानुसार चांगल्या कामासाठी लाच घेणा-या सरकारी अधिका-याला शिक्षा दिली जाणार नव्हती. मात्र कायदा समितीने यावरही आक्षेप घेतला आहे.