शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या व्हीसीत ८ देशांचे प्रमुख झाले सहभागी; कोरोनाशी सार्कचा संयुक्त लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:50 IST

व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहायक (आरोग्य) झफर मिर्झा यांचा समावेश होता.

नवी दिल्ली : संपूर्ण जगात पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचे प्राण घेऊन पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला (कोविड-१९) अडवण्याची व्यूहरचना आखण्यासाठीच्या रविवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क देशांचे नेते आणि प्रतिनिधी सहभागी होते.व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहायक (आरोग्य) झफर मिर्झा यांचा समावेश होता. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या प्रारंभीच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, दक्षिण आशियायी विभागात कोविड-१९ ने १५० पेक्षा कमी लोकांचे प्राण गेले असले तरी आम्ही सावध राहण्याची गरज आहे. ‘तयारीत असावे; परंतु दहशत घ्यायची गरज नाही’.हा भारताचाकोरोना व्हायरसच्या उद्रेकाला हाताळताना मार्गदर्शक मंत्र आहे. आम्ही जानेवारीच्या मध्यापासूनच भारतात येत असलेल्या लोकांची तपासणी करायला सुरुवात केली होती. नंतर हळूहळू प्रवासावरील निर्बंध वाढवले गेले, असे मोदी म्हणाले.टप्प्याटप्प्याने उपाययोजनांमुळे भीती किंवा दहशत टाळण्यास मदत झाली आणि ज्या गटांना धोका होऊ शकतो त्यांच्यापर्यंत विशेष प्रयत्न पोहोचले. सार्क देशांंनी एकत्र येऊन कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी काय करता येईल, असे मोदी शुक्रवारी म्हणाले होते व या सुचनेला सगळ्या देशांनी पाठिंबाही दिला होता. सार्क देशांच्या आठ सदस्य देशांनी जगासमोर उदाहरण ठेवावे व या सगळ्यांनी संयुक्त अशी व्यूहरचना तयार करावी, असे मोदी म्हणाले होते.‘इमर्जन्सी फंड’साठी भारताचे १० दशलक्ष डॉलर्सपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोविड-१९ इमर्जन्सी फंड’ स्थापन करण्यात यावा, असे सुचवून त्यासाठी भारताचे १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असतील, असे सांगितले. सार्क देशांनी एकत्र येऊन कोरोना व्हायरसशी लढण्याची व्यूहरचना आखावी, अशी सूचना मोदी यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केली.पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा केला उपस्थितया व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी केला. पाकिस्तानचे आरोग्य राज्यमंत्री जफर मिर्झा यांनी कोरोना व्हायरसला रोखण्याचा उपाय म्हणून काश्मीरमध्ये जनतेच्या येण्या-जाण्यावर असलेले निर्बंध मागे घ्यावेत, असे म्हटले.जम्मू आणि काश्मीरमधील आरोग्याची आणीबाणी पाहता तेथे कोविड-१९ चा उद्रेक झाला, ही काळजी करण्याची बाब आहे. त्यामुळेच तेथे असलेले सगळे निर्बंध तात्काळ मागे घेतले जावेत. दूरसंचार आणि येणे-जाणे खुले झाले की, माहितीचा प्रसार व औषधांचा पुरवठा होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी