शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

६० जणांची दृष्टी घालवणारा डॉक्टर अटकेत

By admin | Updated: December 6, 2014 00:19 IST

पंजाबातील गुरुदासपूर येथे डोळे तपासणी शिबिरादरम्यान मोतीबिंदूची कथित शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला शुक्रवारी अटक करण्यात आली.

गुरदासपूर/नवी दिल्ली : पंजाबातील गुरुदासपूर येथे डोळे तपासणी शिबिरादरम्यान मोतीबिंदूची कथित शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला शुक्रवारी अटक करण्यात आली. याशिवाय एका खासगी इस्पितळावर तसेच मथुरा येथील एनजीओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित शस्त्रक्रियेमुळे ६० जणांनी डोळे गमावल्याचे उघड झाले आहे.केंद्र शासनाने राज्य सरकारकडे या घटनेचा अहवाल मागितला असून पंजाब सरकारने देखील घटनेच्या उच्चस्तर चौकशीचे आदेश दिले. अटकेत असलेल्या डॉक्टरचे नाव विवेक अरोरा असून तो जालंधरच्या आयकेअर सेंटरचा संचालक असल्याची माहिती गुरुदासपूरचे उपायुक्त अभिनव त्रिखा यांनी दिली. यासंदर्भात शिबीेर संयोजक मंजितसिंग यांना देखील ताब्यात घेण्यात आले.गुरुवारी अमृतसर येथून आलेल्या वृत्तानुसार ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० जणांवर गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या सर्वांना डोळे गमवावे लागले. सर्वजण गरीब कुटुंबातील आहेत. यातील १६ जण अमृतसर जिल्ह्यातील गांवातील असून उर्वरित सर्वजण गुरुदासपूर येथील आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव विन्नी महाजन यांना उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती चंदीगड येथे शासकीय प्रवक्त्याने दिली.सर्व पीडितांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय सर्व पीडितांच्या मोफत उपचाराचे आदेश देण्यात आले आहेत. नव्याने उपचार करण्यासाठी काय करता येईल याचीही माहिती घेण्यास सांगण्यात आले.अमृतसरचे सिव्हिल सर्जन राजीव भल्ला यांच्या नोंदीनुसार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत घाणेरड्या वातावरणात करण्यात आल्यामुळे ६० लोकांनी डोळे गमावले. (वृत्तसंस्था)