शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेअंतर्गत ५० हजार कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: December 30, 2015 01:44 IST

मुद्रा योजनेअंतर्गत बँकांनी लघु उद्योजकांना आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. तुम्ही नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा

नवी दिल्ली : मुद्रा योजनेअंतर्गत बँकांनी लघु उद्योजकांना आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. तुम्ही नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा असे आवाहनही त्यांनी केले.अनुसूचित जाती, जमातीतील उद्योजकांच्या एका राष्ट्रीय परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, ८० हजार जणांचा पीएमएमवाय अर्थात प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यांना ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसीमधील लाभार्थ्यांचा समावेश आहे. या माध्यमातून १४ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, अनुसूचित जाती- जमातीच्या या संघटनेला सरकार आवश्यक हवे ते सहकार्य करेल. या संघटनेचा प्रगतीचा वेग आगामी दोन वर्षात दुपटीने वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे शक्य आहे, कारण केंद्रात तुमचे हक्काचे सरकार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पाच उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सामाजिक न्याय विभागाचे मंत्री गेहलोत म्हणाले की, मागील वर्षी १.५ लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे मिलिंद कांबळे म्हणाले की, संघटना दलित उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार तर होतेच; पण ते एक अर्थतज्ज्ञही होते, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून उपेक्षित समाजातील गरजूंना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील.अनुसूचित जाती, जमातीतील उद्योजकांसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे सरकार आपले सर्वांचेच सरकार आहे आणि सर्वांच्या सशक्तीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.