500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद - पंतप्रधान

By Admin | Updated: November 8, 2016 21:12 IST2016-11-08T20:26:11+5:302016-11-08T21:12:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

500 and 1000 rupees notes closed today midnight: PM | 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद - पंतप्रधान

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून बंद - पंतप्रधान

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नरेंद्र मोदींनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 30 डिसेंबर 2016पर्यंत 500 आणि 1000च्या नोटा पोस्टात किंवा बँकेत जमा करता येणार आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान लवकरच 500 आणि 2000च्या नव्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनात आणणार आहे. ज्यांना 500 आणि 1000च्या नोटा 30 डिसेंबर 2016पर्यंत जमा करता येणार नाहीत त्यांना 31 मार्च 2017पर्यंत आयडी प्रूफसह नोटा जमा करण्याची मुदतवाढ दिली आहे.

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रुग्णालयात नोव्हेंबर 2016पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. रेल्वे, बस आणि विमानतळाच्या तिकीट काऊंटरवर या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. देशात दहशतवाद आणि बनावट नोटांमुळे भ्रष्टाचार वाढत आहे. 500 ते 1000 च्या नोटांचा वापर 80 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दहशतवाद आणि बनावट नोटांच्या विरोधात लढाई उभारायला हवी. भ्रष्टाचा-यांकडून सव्वा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. दहशतवाद आणि बनावट नोटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे, असंही ते म्हणाले आहेत. 
 

Web Title: 500 and 1000 rupees notes closed today midnight: PM