शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:31 IST

जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटूचा किताब पटकावणाऱ्या फौजा सिंग यांचे सोमवारी वयाच्या ११४ व्या वर्षी रस्ते अपघातात निधन झाले. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे.

सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटूचा किताब पटकारे फौजा सिंग यांचा काल रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या प्रकरणी आता एक नवीन माहिती समोर आली आहे.एका फॉर्च्युनर कारने त्यांना त्यांनी बांधलेल्या ढाब्यासमोरच उडवले होते.यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा ढाबा त्यांच्या मुलाच्या नावे होता. मुलाचा काही वर्षापूर्वी या ढाब्यावर मृत्यू झाला होता. 

जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात

नशिबाचा खेळ...

३३ वर्षांपूर्वी १९९२ मध्ये, फौजा सिंग हे त्यांच्या मोठा मुलगा कुलदीपसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बियास गावातील त्यांच्या घराजवळ एक ढाबा बांधत होते. बांधकामादरम्यान, भिंतींवर पाणी टाकताना त्याचे शटरिंग कोसळले आणि या अपघातात त्यांचा मुलगा कुलदीप यांचा मृत्यू झाला.

फौजा सिंग हळूहळू त्या धक्क्यातून सावरले, परंतु त्यांनी त्यांच्या मुलाच्या आठवणीत बांधलेला तो ढाबा मिळवला आणि नंतर तो भाड्याने दिला. ढाब्याचे नाव कुलदीप वैष्णो ढाबा आहे. वयाच्या ११४ व्या वर्षीही, फौजा सिंग त्यांच्या फिरायला जाताना दररोज ढाब्यावर जात होते.

नशिबाचा खेळ पहा की सोमवारी दुपारी ३.१५ वाजता पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर एका पांढऱ्या कारने फौजा सिंग यांना धडक दिली जेव्हा ते रस्ता ओलांडून त्याच ढाब्यावर जात होते.

कार चालकाला अटक

 पोलिसांनी कारला धडक देणाऱ्या फॉर्च्युनरचा चालक अमृतपाल सिंग ढिल्लन याला अटक केली आहे. पोलिसांनी कारही जप्त केली आहे.

आरोपीने कबूल धडक दिल्याचे कबूल केले. तो अपघाताच्या वेळी कारमध्ये एकटाच होता. भोगपूरहून किशनगडला जात होता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ही कार कैद झाली होती, याच्या आधारे पोलिसांनी चौकशीनंतर त्याला अटक केली. फॉर्च्युनर (PB20-C-7100) ही बालाचौर शहरातील हरप्रीतच्या नावावर नोंदणीकृत आहे.

पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून चौकशी केली. तेव्हा ती गाडी तीन ठिकाणी विकली गेल्याचे आढळून आले. एसएसपी हरविंदर सिंग विर्क यांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली.

अपघातापूर्वी लुधियानाचे निवृत्त डीएसपी देखील अपघातस्थळावरून कारमधून निघून गेले. सोमवारी पोलिसांनी डीएसपीची चौकशी केली. लिंक्स जोडून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.

टॅग्स :Accidentअपघात