शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर ३० मीटर लांबीचे भुयार !

By admin | Updated: March 5, 2016 02:39 IST

जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानकडून भारतीय क्षेत्रापर्यंत खोदण्यात आलेल्या ३० मीटर लांबीच्या भुयाराचा छडा लावला.

जम्मू : जम्मू जिल्ह्याच्या आर.एस.पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानकडून भारतीय क्षेत्रापर्यंत खोदण्यात आलेल्या ३० मीटर लांबीच्या भुयाराचा छडा लावला. बीएसएफचे हे फार मोठे यश असून जम्मू क्षेत्रात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या हेतूनेच हे भुयार खोदण्यात आले होते असे दलाने स्पष्ट केले आहे.या क्षेत्रात २०१२ पासून आतापर्यंत बीएसएफने शोधून काढलेले हे चौथे भुयार आहे. दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, गेल्या महिनाभरापासून आम्ही शोध मोहीम राबवित होतो. त्यादरम्यान गुरुवारी रात्री आम्हाला हे भुयार आढळले. हे भुयार जेसीबीच्या मदतीने खोदण्यात येत होते. सीमेपलीकडून काही हालचाली सुरू असल्याचा संशय सुरक्षा दलाला आला होता. रात्री उशिरापर्यंत आवाज ऐकू येत होते. लोक सीमेपलिकडील चौकीतून येताना दिसत होते. हे भुयार जवळपास १० फूट खोल आणि ३० मीटर लांब आहे. (वृत्तसंस्था)विशेष म्हणजे हे भुयार एका बाजूनेच उघडे होते. भारतीय हद्दीत त्यातून बाहेर पडण्याचे दार नव्हते कारण त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. घुसखोरीचा हेतूजम्मू क्षेत्रात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या हेतूने पाकिस्तानच्या बाजूने हे भुयार खोदण्यात आले होते,अशी माहिती जम्मू फ्रंटियरमधील बीएसएफचे महाअधिक्षक राकेश शर्मा यांनी दिली. वेळीच याचा शोध लागला नसता तर पाकिस्तान भारतीय हद्दीत फिदायीन आणि इतर दहशतवाद्यांना घुसविण्यात यशस्वी झाला असता, असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या गवत काढण्याच्या मोहिमेला पाकचा विरोध सुरू होता. बहुदा बीएसएफ हे भुयार शोधून काढेल असे त्याला वाटत होते. फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी घुसखोर ठारजालंधर: पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोरास ठार केले. मृताची ओळख अद्याप पटली नसून कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा चौकीवर तैनात दलाच्या जवानांनी त्याला रोखून आत्मसमर्पण करण्यास सांगितले. परंतु त्याने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे जवानांनी त्याला गोळ्या घातल्या.> पाकिस्तानची अफजल चौकी आणि भारताच्या अल्ला माई दी कोठी चौकीच्या अगदी जवळ पोहोचलेल्या या भुयारातून एक व्यक्ती सहजपणे आत जाऊ शकत होती.यापूर्वी बीएसएफने जुलै २०१२ मध्ये सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ४०० मीटर लांबीच्या सीमापार भुयाराचा छडा लावला होता. त्यानंतर मे २०१४ मध्ये चिल्लयारी सीमेजवळ २३ मीटर लांबीचे तर आॅगस्ट २०१४ ला जम्मू क्षेत्रातील पल्लनवाला सेक्टरमध्ये १३० ते १४० मीटर लांब भुयाराचा शोध लागला होता.