कॅनरा बँकेची ३० लाखाने फसवणूक

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:03+5:302014-12-25T22:41:03+5:30

कर्जदार आणि मोटर कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल

30 lakhs of Canara Bank fraud | कॅनरा बँकेची ३० लाखाने फसवणूक

कॅनरा बँकेची ३० लाखाने फसवणूक

्जदार आणि मोटर कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल
नागपूर : कॅनरा बँकेची ३० रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी सूरज अण्णाजी ठाकरे आणि मंधात मोटर्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सीताबर्डी पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सूरज ठाकरे यांनी बीएमडब्ल्यू कार घेण्यासाठी ३० लाख रुपयांचे कर्ज प्रकरण कॅनरा बँकेच्या सीताबर्डी शाखेत दाखल केले. बँकेने ठाकरेकडून आवश्यक कागदपत्रे घेतल्यानंतर कार घेण्यासाठी ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. ठाकरेंना बीएमडब्ल्यू कार घेण्यासाठी मंधात मोटर्स कंपनीच्या नावे डीडी बनवून दिला. हा डीडी मंधात मोटर्सच्या खात्यात जमा झाला. मात्र, कंपनीने कार न घेता किंवा बँकेला न कळविता ३० लाख रुपयांचा डीडी ठाकरेच्या खात्यावर जमा केला. ५ सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१४ च्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ठाकरेने कार विकत घेतली नाही किंवा बँकेकडे कर्जाची परतफेडही केली नाही. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक पदुजपूर्ती चंद्रशेखर (वय ५४) यांनी सीताबर्डी पोलिसांकडे बुधवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ४०६, ४२०, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक चोपडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
----
चौकशीला सुरुवात
अधिक माहितीसाठी सीताबर्डी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी चौकशीला जेमतेम सुरुवात झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची विस्तृत माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. मंधात मोटर्स कंपनीचे कार्यालय कुठे आहे, ठाकरे कुठे राहतात, काय करतात, त्याची आता चौकशी करू, असेही ते म्हणाले.
----

Web Title: 30 lakhs of Canara Bank fraud