शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूने कोसळला दु:खाचा डोंगर; सुसाईड नोटमध्ये व्यथा मांडून संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 19:41 IST

Heart wrenching incident in Rajasthan: राजस्थानमधील पाली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पाली : राजस्थानमधील पाली येथील घटनेचे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. इथे एका निष्पाप मुलाच्या मृत्यूने दु:खी होऊन संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी घेत जीवन संपवले आहे. टाकीत उडी मारलेल्या दाम्पत्याचा आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या कुटुंबात एकच मुलगी उरली आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी ती शाळेत गेली होती. या घटनेची माहिती समोर येताच एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांना धक्का बसला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पाली जिल्ह्यातील रोहट पोलीस स्टेशन परिसरातील सांझी या गावातील आहे. खरं तर इथे एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केली आहे. या गावातील भल्लाराम मेघवाल यांचा मुलगा भीमराव मागील काही काळापासून आजारी होता. बुधवारी त्यांची पत्नी आणि मुलगी भल्लारामला डॉक्टरला दाखवण्यासाठी रोहट येथील रुग्णालयात जात होते. दरम्यान, त्यांचा तीन वर्षांचा एकुलता एक मुलगा भीमराव वाटेतच मरण पावला. यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. 

मुलाच्या मृतदेहासह मारली उडी दरम्यान, तेथून ते गावाकडे परतायला लागले. तणावाखाली संपूर्ण कुटुंबाने निष्पाप मुलाच्या मृतदेहासह गावाजवळील टाकीत उडी घेतली. यामुळे भल्लाराम आणि त्यांच्या पत्नीसह पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रोहट पोलीस ठाण्याचे प्रभारी उदय सिंग पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी सापडली सुसाईड नोटपोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढले. याच टाकीजवळ मृत भल्लाराम यांची गाडी उभी होती. भल्लाराम यांचे जॅकेट त्यांच्या दुचाकीवर ठेवले होते. भल्लाराम यांची सुसाईड नोट त्याच जॅकेटमध्ये ठेवण्यात आली होती. त्यात त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले आहे. मात्र, आत्महत्येमागील कारणाबाबत पोलीस सध्या काहीही सांगत नाहीत. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण रोहट परिसरात शोककळा पसरली आहे. मृत भल्लाराम मेघवाल यांच्या घरात पाच सदस्यांपैकी फक्त एक आठ वर्षांची मुलगी उरली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस