बडोदा : शहरातील एका सरकारी बँकेच्या एटीएमसमोर एका पेटीत २४.६८ लाख रुपये सापडल्याने पोलिसांची दमछाक झाली. हे पैसे एटीएममध्ये नोटा भरणाऱ्या संस्थेचे कर्मचाऱ्यांकडून विसरून राहिल्याचे नंतर स्पष्ट झाले.२ हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम होती. जव्हेर नगर भागातील वाघोडिया रोडवर शनिवारी रात्री एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ही पेटी दिसली. उघडून पाहिल्यानंतर त्याला त्यात पैसे दिसले. रात्री उशिरा ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. विशेष म्हणजे, २३ फेब्रुवारीपासून ही पेटी एटीएमबाहेर पडून होती. सुमारे चार दिवसांपर्यंत तिच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. ही लुटीची रक्कम असावी, असा संशय आल्याने विद्यार्थ्याने पोलिसांना कळविले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}