शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रसेल्समधून २४२ भारतीय परतले

By admin | Updated: March 26, 2016 01:01 IST

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे विमानतळ आणि मेट्रो स्थानकावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अडकून पडलेले २४२ भारतीय शुक्रवारी जेट एअरवेजच्या विमानाने

नवी दिल्ली : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे विमानतळ आणि मेट्रो स्थानकावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अडकून पडलेले २४२ भारतीय शुक्रवारी जेट एअरवेजच्या विमानाने मायदेशी परतले आहेत. अ‍ॅमस्टरडॅमहून ९ डब्ल्यू १२२९ हे विमान येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यात २८ विमान कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.यातील ६९ प्रवाशांना मुंबईला पाठविले जाणार होते; मात्र तांत्रिक अडचणीमुळे अखेरच्या क्षणी त्यांचे विमान रद्द करण्यात आले. तत्पूर्वी ब्रसेल्समध्ये अडकून पडलेल्या भारतीय प्रवाशांना रस्तामार्गे ब्रसेल्सहून अ‍ॅमस्टरडॅमला पाठविण्यात आले होते. भारतीय प्रवाशांचे विमान पहाटे ५.१० वाजता दिल्लीला उतरल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने दिली आहे. ब्रसेल्स येथील हल्ल्यात ३१ जण ठार तर ३०० जण जखमी झाले आहेत. ‘जेट’ची दोन खास विमाने...जेट एअरवेजने गुरुवारी अ‍ॅमस्टरडॅम आणि टोरोंटोसाठी दोन खास विमानांची व्यवस्था केली होती. ब्रसेल्स विमानतळावर अडकलेली सर्व चार विमाने बाहेर काढल्यानंतर या विमान कंपनीने प्रारंभी तीन विमानांची व्यवस्था केली होती. त्यात मुंबईसाठीच्या विमानाचाही समावेश होता, मात्र तिसरे विमान रद्द करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्फोट होताच प्रवाशांची उडाली धावपळ - टोरोंटोहून आमचे विमान ब्रसेल्स येथे उतरताच स्फोट झाला, असे एका महिलेने ब्रसेल्स येथील विमानतळावर झालेल्या तीन स्फोटानंतरची आपबिती सांगताना नमूद केले. या महिलेने सांगितले की विमानतळाच्या बहिर्गमन भागात (डिपार्चर) स्फोट झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी बॅगा हाती घेत एकच धावपळ केली.स्फोट झाल्यानंतर लगेच आम्ही ब्रसेल्स विमानतळावर उतरल्यामुळे आम्हाला विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रवेश मिळाला नाही, आम्हाला अन्यत्र नेण्यात आले. आमच्या सर्वांची चांगल्याप्रकारे काळजी घेण्यात आली, अशी माहिती एका अन्य प्रवाशाने दिली.