शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

2018 र्पयत 15 कोटी बँक खाती सुरू होणार

By admin | Updated: July 30, 2014 01:34 IST

वित्तीय समायोजन धोरणाच्या अंमलबजावणीकरिता केंद्र सरकारने 15 ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला असून दोन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट करतानाच याची रूपरेखा मंगळवारी स्पष्ट केली.

नवी दिल्ली : वित्तीय समायोजन धोरणाच्या अंमलबजावणीकरिता केंद्र सरकारने 15 ऑगस्टचा मुहूर्त निश्चित केला असून दोन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट करतानाच याची रूपरेखा मंगळवारी स्पष्ट केली. 
वित्तमंत्रलयाच्या अधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्तीय समायोजनाच्या धोरणातंर्गत 2क्18 र्पयत 15 कोटी कुटुंबांची बँक खाती सुरू करण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, 15 ऑगस्ट 2क्14 ते 15 ऑगस्ट 2क्15 असा या योजनेचा पहिला टप्पा आहे, तर 15 ऑगस्ट 2क्15 ते 15 ऑगस्ट 2क्18 असा या योजनेचा दुसरा टप्पा आहे. दोन्ही टप्प्यांत एकत्रितपणो 15 कोटी बँक खाती सुरू करण्यात येतील. कालबद्ध कार्यक्रमानुसार त्याची किती व कशी अंमलबजावणी झाली याची माहिती पुढीलवर्षी 15 ऑगस्टला देण्यात येईल.
वित्तीय समायोजनाच्या धोरणांतर्गत, प्रत्येक खातेधारकाला केवळ बँकिंग सुविधाच देण्यात येणार नाहीत, तर त्याने जर खात्याचे व्यवहार काळजीपूर्वक जोपासले तर त्याचे खाते सुरू झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीनंतर संबंधित ग्राहकाला बँक खात्यावर पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच, बँक खाते सुरू करताना संबंधित ग्राहकाला ‘रुपे’ या भारतीय तंत्रज्ञानावर आधारित डेबिट कार्ड देण्यात येणार असून या माध्यमातून एक लाख रुपयांच्या अपघात विम्याचे कवचही देण्यात येणार आहे. 
याचसोबत, मायक्रो इन्शुरन्स, कृषी विमा तसेच ‘स्वावलंबन’ ही पेन्शन योजना राबविण्याचाही सरकारचा मानस आहे. ही योजना यशस्वीरीत्या पोहोचविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर एटीएम केंद्रांची उभारणीही करण्यात येणार आहे.
 सध्या ग्रामीण किंवा दुर्गम भागांतील एटीएम मशीनची संख्या ही अवघी 23, 334 इतकी आहे.  या कालबद्ध कार्यक्रमांतर्गत ही संख्या किमान दुपटीने वाढविण्याचे लक्ष्य आहे. या मशीनद्वारे बँकांत होणारे सर्व प्राथमिक व्यवहार पूर्ण होतील, अशा पद्धतीने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ही मशीन्स परिपूर्ण ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सरकारने निश्चित केलेल्या या दोन्ही टप्प्यांत प्रामुख्याने लक्ष्य हे ग्रामीण, दुर्गम तसेच डोंगराळ भागात राहणा:या नागरिकांर्पयत पोहोचण्याचे असून, या लोकांर्पयत एकदा बँकिंग व्यवस्था पोहोचली की आपोआपच ते विविध प्रकारच्या कर्जाच्या आणि अन्य गुंतवणुकीच्या योजनांच्या माध्यमातून वित्तीय चक्रामध्ये समाविष्ट होतील.
 
च्वित्तीय समायोजन ही संकल्पना संपुआ सरकारने मांडली होती व या माध्यमातून 2क्12 व 2क्13 या दोन वर्षात 23 हजारांपेक्षा जास्त खेडय़ांमध्ये बँकिंग व्यवस्था पोहोचविण्यात आली होती.