शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राइकमध्ये तोयबाचे २० अतिरेकी ठार

By admin | Updated: October 10, 2016 05:31 IST

उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे २० अतिरेकी मारले गेले असा दावा गुप्तचर विभागाने केला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद हाच तोयबाचा प्रमुख आहे. या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यात जी चर्चा झाली आहे त्यावरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या हल्ल्यात तोयबाचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. भारतीय सैन्याकडून अशी काही कारवाई होईल, याची पुसटशी कल्पनाही या अतिरेक्यांना नव्हती. त्यामुळे या कारवाईने ते थक्कच झाले. भारतीय सैन्याने या अतिरेक्यांना मारण्यास सुरुवात केली तेव्हा हे अतिरेकी त्यांच्या चौकीकडे पळताना दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची वाहने आली आणि त्यांनी हे मृतदेह अज्ञात स्थळी नेले. सिमेपलीकडून झालेल्या गोळीबारात आमचे दोन सैनिक ठार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

भांडवल करू नका-

 ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यापूर्वी भारतीय सैन्याने नियोजन केले होते. त्यामुळे ते कशासाठी खोटे बोलतील? आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. हा मामला सैन्य, देश आणि नागरिक यांच्याशी संबंधित आहे. मात्र, या विषयाचे भांडवल भाजपा करीत असल्याचा आरोप, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केला. काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी शेगावात आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.

भारताचा भाग ताब्यात घ्या - रामदास आठवले च्अमरावती : उरी घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्काराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून देशाची शान वाढविली आहे. मात्र, आता शत्रूला धडा शिकविण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरातील भारताचा भाग ताब्यात घ्यावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे रविवारी व्यक्त केले.अमरावती येथे आयोजित बुद्ध महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

‘सर्जिकल स्ट्राईक’चे सरसंघचालकांकडून समर्थन-नागपूर : उरी येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्यावरून देशभरातील राजकारण तापत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या लष्करी कारवाईचे स्वागत केले आहे. आपल्याकडे किती शक्ती आहे हे ती दाखविल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे शक्ती दाखविणे आवश्यक आहे. असे केल्यानेच आज जग आपल्यासोबत उभे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. नागपुरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.