शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

१९... खापरखेडा... अपघात

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

(फोटो)

(फोटो)
विचित्र अपघातात तिघे जखमी
ट्रकचालकास अटक : खापरखेडा - दहेगाव मार्गावरील घटना
खापरखेडा : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक दिली. ही कार ऑटोवर आदळली. यात दोघे गंभीर तर महिला किरकोळ जखमी झाली. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा - दहेगाव (रंगारी) मार्गावरील विटभट्टीसमोर मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
हिसाक युसूफ शेख, शांता पटले व दानिश शेख अशी जखमींची नावे आहेत. एमपी-०९/केसी-५८४२ क्रमांकाचा भरधाव ट्रक दहेगाव (रंगारी)हून खापरखेड्याकडे येत होता. या ट्रकच्यामागे हिसाक शेख व शांता पटले हे एमएच-३१/एएच-७८७१ क्रमांकाच्या ऑटोने खापरखेड्याकडे जात होते. त्याचवेळी दानिश शेख हा एमएच-४०/एसी-५५६ क्रमांकाच्या कारने खापरखेड्याहून दहेगावकडे जात होता. दरम्यान, खापरखेडा - दहेगाव मार्गावरील विटभट्टीसमोर भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. त्यातच ट्रकच्या मागे असलेला ऑटोही या कारवर आदळला आणि रोडच्या कडेला उलटला. यात ऑटोतील दोघे व कारमधील एक असे तिघे जखमी झाले.
अपघात होताच
परिसरात असलेल्या आकाश राऊत आणि दिलीप खापरे या दोघांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या दोघांनीही तिन्ही जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि लगेच खापरखेडा पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तिन्ही जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ हलविले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून ट्रकचालक कदीर मुन्नू शेख (५०, रा. मुलताई, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) या अटक केली. सदर घटनेचा तपास खापरखेडा पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)
----------चौकट--------
क्वॉलिसने बालकास उडविले
भरधाव क्वॉलिसने रोड ओलांडत असलेल्या पाच वर्षिय बालकास उडविले. यात तो बालक गंभीर जखमी झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. जखमी बालकाचे नाव कळू शकले नाही. तो त्याच्या आजीच्या मागेच रोड ओलांडत होता. दरम्यान, एमएच-३१/एजी-६०५३ क्रमांकाच्या भरधाव क्वॉलिसने त्याला उडविले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी क्वॉलिस जप्त करून चालक हमीद अजीज खान (४८, रा. महाल, नागपूर) यास अटक केली. या ठिकाणी पूर्वी एका विद्यार्थ्याचा व वृद्धाचा अपघाती मृत्यू झाला होता.
***