शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

१९... गुन्हे

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

तीन चोरट्यांना अटक

तीन चोरट्यांना अटक
कामठी : बैलगाडीची लोखंडी चाके चोरून नेत ते कबाडी व्यावसायिकांना विकणाऱ्या तीन चोरट्यांना कामठी पोलिसांनी नुकतीच अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
भगवान रामचंद्र राऊत (२६), दीपक प्रकाश बडोदे (२८) व पप्पू बाबुलाल गोयल तिघेही रा. आजनी, ता. कामठी अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. कामठी पेालीस ठाण्याच्या हद्दीतील शिरपूर येथील शेतकरी हटवार यांच्या बैलगाडीची दोन्ही लोखंडी चाक १५ दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. दरम्यान, कामठी पोलीस गुरुवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना तिन्ही आरोपी ही चाके एमएच-४०/एम-६९०८ क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात ठेवून कामठी येथे विक्रीला नेत असताना आढळून आले. संशय बळावल्याने पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली. त्यात ती चाके चोरीची असल्याचे स्पष्ट होताच चाके जप्त करून तिघांना अटक केली. याप्रकरणी कामठी पेालिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***
रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू
कामठी : धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने पडून गंभीर जखमी झालेल्या अनोळखी प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कामठी-कन्हानदरम्यानच्या उंटखाना परिसरात गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
हा प्रवासी मुंबई - हावडा एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. तो कामठी - कन्हान दरम्यानच्या उंटखाना परिसरात धावत्या रेल्वेतून खाली कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर प्रवाशाचे वय ४५ च्या आसपास आहे. याप्रकरणी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
जळाल्याने एकाचा मृत्यू
कामठी : जळाल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी शिवारात नुकतीच घडली.
ज्ञानेश्वर वासुदेव वाघमारे (४७) असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा खैरी शिवारातील शेतात असलेल्या घरी राहायचा. दरम्यान, घराला लागलेल्या आगीत तो गंभीररीत्या जखमी झाला. तो ८० टक्के जळाल्याने नागपूर येथील मेयो रुग्णलयात भरती केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***