शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
2
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
3
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
4
विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
7
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
10
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
11
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
12
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
13
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
14
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
15
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
16
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
17
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
18
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
19
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
20
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

१८... कोदामेंढी... धान

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

(फोटो)

(फोटो)
धानाच्या गंजीला आग
बेरडेपार येथील घटना : अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान
कोदामेंढी : धानाची कापणी करून शेतात लावण्यात आलेल्या गंजीला आग लावण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. ही घटना कोदामेंढी नजीकच्या बेरडेपार येथे घडली.
दिलीप भाकरू धोंगडे (४८) व सोहन सुदाम धोंगडे (३०) दोघेही रा. बेरडेपार, ता. मौदा, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नाव आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांची बेरडेपार शिवारात शेती आहे. दिलीपने यावर्षी तीन एकरात धानाची रोवणी केली होती. शेतातील धानाची कापणी करून त्याचे शेतातच गंजी लावली होती. त्याला अंदाजे ७० पोती धान होण्याची आशा होती.
सोहनने यावर्षी अडीच एकरात धानाची रोवणी करून हा धान नुकताच कापला व शेतात गंजी लावली होती. त्याला अंदाजे ६० पोती धानाचे उत्पादन होण्याची आशा होती. दरम्यान, या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या गंज्या आगीत खाक झाल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. यात अंदाजे १ लाख ९० रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सदर दोन्ही शेतकरी अल्पभूधारक असल्याने हाती आलेले पीक नष्ट झाले. त्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
***