शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

१८... कोंबडबाजार

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

चारगाव शिवारातील कोंबडबाजारावर धाड

चारगाव शिवारातील कोंबडबाजारावर धाड
१३ जणांना अटक : अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त
नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव शिवारात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर बुधवारी रात्री धाड टाकली. यात एकूण १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण दोन लाख ९७ हजार २९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
विनोद मारोतराव चरपे (३०, रा. बुटीबोरी), रविदास ठाकरे (५५, रा. चारगाव), महादेव भगवान राऊत (५२, रा. देवळी सावंगी), विजू रतिराम ठाकरे (२२, रा. चारगाव), कृष्णा नत्थू तेलरांधे (४५, रा. बेला), एकनाथ चिंधू वाघाडे (४५, रा. चारगाव), कवडू बाबूराव रेवाडे (३५, रा. सातगाव), चरण बाबूराव वलके (२५, रा. चारगाव), मिलिंद शत्रुघ्न टेंभरे (२७, रा. नागपूर), एकनाथ तुळशीराम देव्हारे (५३, रा. हिंगणा), राहुल शंकर म्हैसकर (२२,रा. बेला), सुनील गोविंद अंबाडरे (३८, रा. बुटीबोरी), मधुकर तुकाराम वाघाडे (४५, रा. सालईटोली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेला परिसरात गस्तीवर असताना त्यांना चारगाव शिवारात कोंबडबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. यात सदर १३ ही आरोपी कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वांना लगेच अटक करून त्यांच्याकडून ५१ हजार २९० रुपये रोख, सात मोबाईल हॅण्डसेट, चार वाहने, जखमी कोंबडे, काती व इतर साहित्य असा एकूण दोन लाख ९७ हजार २९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी बेला पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, उल्हास भुसारी, मदन आसटकर, अमोल वाघ, विशाल चव्हाण, विनोद भोयर, रवींद्र जाधव, प्रीतेश नारनवरे, नीतेश रोहणकर, शैलेश बनोडे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)
***