‘सीआरपीएफ’चे 17 जवान निलंबित

By Admin | Updated: September 7, 2014 02:28 IST2014-09-07T02:28:05+5:302014-09-07T02:28:05+5:30

केंद्रीय राखीव पोलीस दलाने निष्क्रियतेचा ठपका ठेवून 4 कनिष्ठ अधिका:यांसह 17 जवानांना निलंबित केले.

17 CRPF suspended | ‘सीआरपीएफ’चे 17 जवान निलंबित

‘सीआरपीएफ’चे 17 जवान निलंबित

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाने निष्क्रियतेचा ठपका ठेवून 4 कनिष्ठ अधिका:यांसह 17 जवानांना निलंबित केले. छत्तीसगढमध्ये यावर्षी 11 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी दबा धरून केलेल्या भीषण हल्ल्यात 16 जण ठार झाले होते. त्यात नागरिक व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश होता. हा हल्ला झाल्यानंतर हे निलंबित जवान आपल्या मृत सहका:यांना तसेच सोडून निघून गेले, असे चौकशीत स्पष्ट झाले.
 सुकमा जिल्हय़ात झालेल्या या घटनेनंतर तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली. नक्षलवाद्यांनी ज्या तुकडीवर अरुंद जागेत हल्ला केला त्या तुकडीचे हे निलंबित जवान सदस्य होते. 
हे जवान कृती करण्यात कमी पडले व आपल्या सहका:यांना वाचविण्यासाठी त्यांनी समाधानकारक असा प्रतिकारही केला नाही, उलट ते स्वत:चा जीव वाचविण्यासाठी दूर पळून गेले असा निष्कर्ष चौकशीत निघाला. प्राथमिक चौकशीत हे जवान दोषी आढळल्यामुळे छत्तीसगढच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना निलंबित केले आहे. तीन महिन्यांत पूर्ण चौकशी केली जाईल, असे सीआरपीएफचे महासंचालक दिलीप त्रिवेदी यांनी शनिवारी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 

 

Web Title: 17 CRPF suspended