शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१६... खापा...

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

(फोटो)

(फोटो)
प्रकटदिन व पालखी महोत्सवाची सांगता
खापा येथे आयोजन : शेकडो भाविकांचा सहभाग
खापा : स्थानिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रकटदिन आणि श्री संत ताजुद्दीनबाबा यांच्या पालखी महोत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
याप्रसंगी पंडित विष्णुकांत शास्त्री यांनी कथावाचन केले. सप्ताहाच्या काळात मंगल शहनाई वादन, काकडा आरती, अभिषेक, पारायण, कलशस्थापना, हरिपाठ यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी श्री संत गजानन महाराज व श्री संत ताजुद्दीनबाबा यांची पालखी यात्रा काढण्यात आली. यात स्थानिक राजेंद्र विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दांडिया सादर केला. शिवाय नरेंद्र महाराज सत्संग सेवा मंडळ व सौंसर येथील संतकृपा दिंडी मंडळाचे चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. जामसावळी येथील श्री हनुमानाजीच्या मूर्तीची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली. या पालखी यात्रेत रामटेक, पारशिवनी, कोथूर्णा, बडेगाव, सावनेर, केळवद, कळमेश्वर, खापरखेडा, पाटणसावंगी, वाकोडी, गुमगाव, मध्य प्रदेशातील सौंसर येथील दिंडी पथक व भजन मंडळ सहभागी झाले होते.
या पालखी यात्रेची सुरुवात मंदिराच्या आवारातून करण्यात आली. शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत ही यात्रा मंदिराच्या परिसरात आली. तिथे यात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान, ठिकठिकाणी यात्रेतील सहभागी भाविकांचे स्वागत करण्यात आले. पिण्याचे पाणी, सरबत यांचे वितरण करण्यात आले. यशस्वितेसाठी स्थानिक बाल गणेश मंडळाचे सदस्य, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पंचकमिटीतील सदस्य आणि भाविकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
***