शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१६... गुन्हे

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

अवैध दारू विक्रेत्यास पकडले

अवैध दारू विक्रेत्यास पकडले
नांद : भिवापूर पोलिसांनी रविवारी दुपारी केलेल्या कारवाईमध्ये अवैध दारू विक्रेत्यास पकडले. त्याच्याकडून दारूच्या ९५ बाटल्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राकेश पत्रू डांगे (२४, रा. गदगाव, चिमूर, जिल्हा चंद्रपूर) असे कारवाई करण्यात आलेल्या अवैध दारू विक्रेत्याचे नाव आहे. पोळगाव शिवारातून दारूच्या बाटल्यांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती भिवापूर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी या शिवारात जाऊन राकेशकडे असलेल्या बॅगची कसून तपासणी केली. त्यात दारूच्या ९५ बाटल्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बाटल्या जप्त केल्या. या दारूची किंमत ५,७०० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास हवालदार संजय पायक व शिपाई गजघाटे करीत आहे. (वार्ताहर)
***
पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरी
खापरखेडा : स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरट्यांनी हात साफ करीत १९,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
खापरखेड्यापासून दोन कि.मी.अंतरावर दक्षिणेला शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे. चोरट्यांनी या दवाखान्याच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि आत ठेवलेला कॅमेरा, कूलर, स्टोव्ह यासह अन्य साहित्य घेऊन पळ काढला. या साहित्याची किंमत १९,७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर घटनेचा तपास सहायक फौजदार मिश्रा करीत आहे. (प्रतिनिधी)
***
काटोल येथे चोरी
काटोल : स्थानिक लक्ष्मीनगरात चोरी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी १३०० रुपये किमतीचा एवज चोरून नेला.
फिर्यादी सतीश गुलाब पुंजे (५०, रा. लक्ष्मीनगर, काटोल) हे बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी घरातील चांदीचे साहित्य चोरून नेले असून, त्या साहित्याची किंमत १३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***