शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

हज दुर्घटनेत १४ भारतीयांचा मृत्यू, १३ जखमी

By admin | Updated: September 25, 2015 15:07 IST

हज दुर्घटनेतील मृतांमध्ये १४ भारतीय भाविकांचा समावेश असून १३ जण जखमी झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. २५ - सौदी अरेबियातील हज यात्रेत गुरूवारी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भारतीयांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून १३ जखमींवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मीना शहरात काल सकाळी झालेल्या या दुर्घटनेत आत्तापर्यंत ७१७ भाविक मृत्यूमुखी पडले असून सुमारे ८६० जण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वात भीषण दुर्घटना आहे. 
मीना शहरात काल सकाळी आठच्या सुमारास भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सैतानाला दगड मारण्याच्या वेळी (एक धार्मिक प्रथा) गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. १४ भारतीय मृतांमध्ये गुजरातमधील ९ भाविकांचा तर झारखंड व तामिळनाडूतील प्रत्येकी २ व महाराष्ट्रातील १ भाविकाचा समावेश आहे. तसेच  १३ जखमींपैकी १ भाविकही महाराष्ट्रातील आहे.  
या दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकले नसले तरी प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका अरुंद जागी ही दुर्घटना झाली. काही भाविक सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेसाठी एका रस्त्याने जात होते, तर ही प्रथा पूर्ण करून आलेले भाविक याच रस्त्याने परत येत होते. त्यामुळे रस्ता बंद होऊन ही चेंगराचेंगरी झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार दुसरा एक अंदाज वर्तविला जात आहे की, सुरक्षारक्षक भाविकांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते आणि पुढे न जाण्याविषयी विनंती करत होते; पण भाविक न थांबता या रस्त्याने पुढे जाऊ लागले आणि चेंगराचेंगरी झाली.
 
सुषमा स्वराज यांनी मक्का येथील इमर्जन्सी नंबरही दिला आहे :
 
00966125458000
 
00966125496000
 
सौदीतील भाविकांसाठी टोल फ्री क्रमांक : 8002477786